कोकणगाव खून प्रकरणातील मुख्य आरोपी पत्नीसह अटकेत; आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..

दिनांक १८ फेब्रुवारी २०२६, श्रीगोंदा:

तालुक्यातील कोकणगाव येथील भाऊसाहेब रजपूत हत्याकांडाला महिना उलटल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरने मुख्य आरोपी महेश चव्हाण याला त्याच्या पत्नीसह अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महेश चव्हाण आणि त्याची पत्नी दोघेही ताब्यात घेण्यात आले आहेत.

महिनाभर आरोपी फरार असल्याने पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

आरोपींना पकडण्यासाठी पीडित कुटुंब आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी सोमवारपासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर व्यापक जनआंदोलनाची तयारी सुरू केली होती.

https://www.amazon.in/dp/B0FXRFKQ2K/ref=cm_sw_r_as_gl_apa_gl_i_N7AJ2RT57CQG9Q48CA03?linkCode=ml1&tag=nirbhidkalam-21&linkId=a54b9ca091b5ba3f9b0591e8f8b1f7dd

आंदोलनाच्या पूर्वसंध्येलाच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळून परिस्थिती हाताळली आहे.

या अटकेमुळे तणावपूर्ण वातावरण निवळण्याची शक्यता असली तरी, पीडित कुटुंबाकडून मागण्या पूर्तीसाठी आंदोलन करण्यात येणारं असल्याचे समजते आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply