आढळगांव येथील युवकाच्या खूनाचे रहस्य उलघडले. अनैतिक प्रकरणातुन केला खून..

दिनांक ४ मे (आढळगाव,श्रीगोंदा):

दिनांक २ मे रोजी रात्री ८:३० ते १०:०० वा.चे सुमारास जयसिंग विठ्ठल वाकडे वय ५५ राहनार आढळगाव यांचे शेतजमीन गट नं.१३३ / १ येथे त्यांचा मुलगा मुकुंद वाकडे हा सदर शेतामध्ये डाळींबाच्या शेतीला औषधाची फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टर घेवन गेला.परंतु,लवकर परत न आल्याने,घरातील लोकांनी जावुन पाहिले असता,त्याचा गळा कापलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळुन आला.म्हणुन,सदर शेतात डाळीबांच्या झाडांना स्टेजींगसाठी बांधलेल्या तारा व बांबूच्या कैच्या मृतदेहा शेजारी तुटलेल्या दिसल्याने, मुंकूदचा फवारणी करताना ट्रॅक्टरच्या चाकामध्ये तारा गुंतून त्या तारांनी त्याचा गळा कापला गेला असावा,असे तेथे आलेल्या घरच्या लोकांना वाटल्याने,त्याचा अशाप्रकारे अपघाती मृत्यू झाल्याची खबर श्रीगोंदा पोलीस ठाणेस दिली होती.

पंरतु,पोलीसांनी मयत मुकुंदच्या शरीरावरील जखमांचे निरीक्षण केले असता,त्याच्या प्रेतावर गळया व्यतिरीक्त छातीवर , पाठीवर , हातावर धारदार शस्त्राचे वार व जखमा झाल्याचे दिसले. तसेच त्याचे गुप्तांग कापलेल्या अवस्थेत आढळुन आल्याने,त्याचा खुन झाला आहे.अशी पोलीसांची खात्री झाली. सदरच्या जखमा मयताचे वडील जयसिंग वाकडे यांनी पाहील्यानंतर त्यांची सुद्धा मुलाचा खुन झाल्याची खात्री झाली व वैद्यकीय अधिकारी यांनी उत्तरीय तपासणीचा पोस्टमार्टम रिपोर्ट दिला. त्यावरून त्याचा खुन झाल्याचे निष्पण्ण झाले.म्हणुन,त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाणेस गु.र.नं. ४१६ /२०२० भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे मयताच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमावर अज्ञात कारणाने मुलाचा खुन केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर गुन्हयाच्या तपासकामी (पोलीस अधिक्षक) अखिलेश सिंग तसेच (अपर पोलीस अधिक्षक) सागर पाटील, (उपविभागीय पोलीस अधिकारी) संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाणे व (स्था.गु.शा. अहमदनगर) येथील पोलीस अधिकाऱ्यांची पथके तयार करून,रवाना करण्यात आली .त्यामध्ये (पोलीस निरीक्षक) दौलतराव जाधव ,(पोलीस निरीक्षक) दिलीप पवार ,(सपोनि) विठ्ठल पाटील ,(सपोनि) राजेद्र सानप ,(पो.उप.निरी) इंगळे ,(पोहेकॉ.)अंकश ढवळे ,(पोहेकॉ) सुनिल चव्हाण ,(पोना) मखरे , (पोकॉ). प्रकाश वाघ ,(पोकॉ) मांडगे ,(पोकॉ) इगंवले ,(पोकॉ) पठाण ,(पोकॉ) भोर ,(पोकॉ) काळे ,(पोकॉ) दरदंले ,(पोकॉ) सोळंके , यांची विविध पथके तयार करण्यात आली होती . तपासामध्ये(अपर पोलीस अधिक्षक)सागर पाटील व (उपविभागीय पोलीस अधिकारी)संजय सातव यांनी घटनास्थळी भेट देवून,मार्गदर्शन केले.

मयत मुकुंद याचे नातेवाईकांकडे बारकाईने तपास करूनही काही एक धागादोरा किंवा दुश्मनीचा अगर अनैतीक संबधाचा संशय निष्पन्न् होत नव्हता. म्हणून, स्थानिक खबऱ्यामार्फत मिळालेल्या व तांत्रिक माहिती आधारे एका संशयीताचे नाव (पो.उप.नि.) इंगळे,(पोहेकॉ) चव्हाण ,(पोहेकॉ) दत्ता हिंगडे व(पोना) मखरे ,(पोकॉ) संदिप दरदले , (पोना) संदिप पवार ,(पोना) बबन बेरड यांना समजले.त्यांनी सदर संशयीताचे घरी जावुन त्याला विचारपुस केली असता.त्याचे हावभाव नैसर्गिक नसल्याने संशय बळावला.म्हणुन, त्याला सोबत घेवुन विश्वासात घेत विचारपुस केली असता, संशयीत नामे दत्तात्रय अंकुश पठाडे रा.चाहुरमळा,आढळगाव ता. श्रीगोंदा याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला तपास अधिकारी सपोनि. विठ्ठल पाटील यांच्या ताब्यात देवुन,कसून चौकशी केली. त्यानंतर त्याला सदर गुन्हयात अटक करण्यात आली.आरोपीकडे अधिक तपास केला असता,आरोपीने सांगितले की अनैतीक संबधाच्या प्रकरणात आरोपी नामे दत्तात्रय पठाडे यांने मयताचे भावजयचे चिथावणीवरून मुकुंद वाकडे याला मारण्याचा पुर्वनियोजीत कट केला. त्यानुसार आरोपीने धारदार शस्त्र सोबत घेवुन जावुन, आरोपीला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या गळयावर व मानेवर तसेच छातीवर पाठीवर गुप्तांगावर व हातावर धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून समजली आहे.

अशा प्रकारे आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. सदर गंभीर गुन्हयाचा उलगडा झालेला असुन,अटक आरोपीस मा.न्यायालयासमोर हजर करून,गुन्हयाचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालु असल्याचे स्थानिक पोलीस प्रशासनाने पोलीस अधीक्षक अखिलेश सिंग यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading