श्रीगोंद्यातील या व्यक्तीचा संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेमध्ये सहभाग..

दिनांक १७ मे २०२४, श्रीगोंदा:

प्रोजेक्ट हंड्रेडचे सचिव श्री. विठ्ठल सोनवणे यांनी दिनांक ९ आणि १० मे २०२४ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या केनियाची राजधानी नैरोबी येथील सिव्हिल सोसायटी परिषदेमध्ये यशस्वी सहभाग नोंदवला. त्यांच्या सहभागामुळे भारत देशाचे नाव उंचवण्यास मदत झाली आहे.

श्री. विठ्ठल सोनवणे यांनी या परिषदेमध्ये “क्लायमेट चेंज बाबतचे होणारे परिणाम” या विषयावर प्रभावी सादरीकरण केले. संयुक्त राष्ट्र संघाच्या अध्यक्षा श्रीम नथुरा युसुफ यांच्यासोबत भारताच्या योगदानाबाबतची चर्चा करण्यात आली.

सदर परिषद आगामी “Summit of the Future” च्या तयारीचा एक भाग म्हणून घेण्यात आली होती. या परिषदेमध्ये ३६०० पेक्षा अधिक सिव्हिल सोसायटी प्रतिनिधी, ४०० सरकारी प्रतिनिधी, ६४ UN सरकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि १०० हून अधिक पत्रकार सहभागी झाले होते.

परिषदेचा मुख्य उद्देश सिव्हिल सोसायटीच्या सहभागाने जागतिक आव्हानांवर प्रभावी उपाय शोधणे आणि त्यांचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचवणे हा होता. या परिषदेत पर्यावरण, सामाजिक न्याय, मानवी हक्क आणि शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) या विषयांवर चर्चा करण्यात आली.

श्री.मेहेर नासिर, UN च्या ग्‍लोबल कम्‍युनिकेशन्‍स विभागाचे आउटरीच डिव्हिजनचे डायरेक्टर, हे परिषदेत सहभागी होते. त्यांच्यासोबत श्रीम.नथुरा युसुफ आणि कॅरोल अ‍ॅगेन्गो हे सह-अध्यक्ष होते.

संपूर्ण भारतातून प्रोजेक्ट हंड्रेडच्या माध्यमातून तीन व्यक्तींना या परिषदेमध्ये संधी मिळाली. त्यापैकी श्री.विठ्ठल सोनवणे हे एक असून, त्यामुळे श्रीगोंदा, अहमदनगर जिल्ह्यासाठी एक भूषणाची बाब आहे. उद्घाटन सत्रामध्ये विशेष अतिथी म्हणून श्री. करीमोट ओडेबोडे यांनी सादर केलेल्या “The Journey Ahead” या कवितेने उपस्थितांना प्रेरणा मिळाली. परिषदेमध्ये मुख्यत्वे युवा प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. ज्यांनी शाश्वत भविष्यासाठी ठोस बदलांची मागणी केली.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading