पांडुरंग किसन खेतमाळीस यांचे वृद्धापकाळाने निधन..

दिनांक १४ मे २०२४, श्रीगोंदा:

तालुक्यातील सामाजिक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या राजकिय संघटनेत सक्रीय असलेले पदाधिकारी संतोष तात्या खेतमाळीस यांचे वडिल स्व.पांडुरंग किसन खेतमाळीस यांचे आज दिनांक १४ मे २०२४ रोजी सकाळी ६:०० वाजनेच्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी चांगुनाबाई, मुलगा संतोष, मुलगी आणि नातवंडं असा परिवार आहे. स्व.पांडुरंग खेतमाळीस यांनी कुटुंब आणि मुलांच्या संगोपनासाठी शेती आणि पशुपालन केले.. त्यांनी त्यांच्या हयातीत सामाजिक योगदान दिले आहे. त्यांच्यावर आज सावतानगर येथील स्मशान भूमीत अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकिय क्षेत्रातील अनेकांनी भावपुर्ण आदरांजली व्यक्त केली.

तर, स्व.पांडुरंग खेतमाळीस यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम गुरुवार दिनांक २३ मे २०२४ रोजी सकाळी श्रीगोंदा फॅक्टरी येथील लिंगाळेश्वर महाराज मंदिर येथे संपन्न होणार आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply