श्रीगोंद्यात संभाजी ब्रिगेडकडून छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी..!

दिनांक १४ मे २०२४, श्रीगोंदा:

आज रोजी सकाळी १०:०० वाजता संभाजी ब्रिगेड पदाधिकारी तसेच श्रीगोंदा तालुका व शहरातील प्रमुख नेते व समस्त शिव, शंभु प्रेमी यांच्या उपस्थिती मोठ्या उस्थाहात फटाके, तोफांच्या आतीशबाजी करत पारंपरिक वाद्य वाजवत, एकमेकास पेढे भरवत मान्यवरांस पुस्तकाची भेट देऊन शिवपुत्र स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी लग्न समारंभात छत्रपपती शिवाजी महाराज यांची आरती घेणे म्हणजे शिवाजी महाराज यांचा पराक्रम हा दैवी चमत्कार असल्याच भासवणे ही चुकीची प्रथा पुढे येत आहे. ही आरती थांबवून छत्रपती शिवाजी महाराज यांचे फक्त पुजन करण्यात यावे अशी भूमिका संभाजी ब्रिगेडकडून मांडण्यात आली. याला उपस्थित सर्व मान्यवरांनी सहमती दर्शवत यापुढे हा संदेश सर्व लग्नकार्यात देण्याचा निश्चय केला.

या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने जेष्ठ नेते बाबासाहेब भोस, निलेश लंके प्रतिष्ठानचे संजय लाकुडझोडे सर, मा.नगराध्यक्ष मनोहर दादा पोटे, मा.उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, राजु दादा गोरे, नगरसेवक राज्याभाऊ लोखंडे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर, उद्योजक आप्पासाहेब सोनवणे, राष्ट्रवादी पक्षाचे जितेंद्र पाटोळे, बमुपाचे नेते संजय सावंत, ॲड.महेंद्र शिंदे सर, शिवाजी धोरजकर, नितीन कुंडकर, बंडोपंत धारकर, संभाजी पोटे, ओंकार चोर संकेत दिंडे, विकास गाढवे, दत्ता शिंदे, दशरथ खेतमालीस, निखिल हवालदार, अक्षय भोळे, संकेत पारे, रमेश चौहान, महावीर भब्बड, शाम सावंत, किशोर ससाणे, ओम् ससाणे, न्यानदेव ससाणे, सोहम साळवे, संतोष शिंदे, सुभाष बोराडे, शिवाआप्पा घोडके, आंनद लगड आदि मान्यवर उपस्थित होते.

याचबरोबर संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, तालुकाध्यक्ष इंजि.शाम जरे, तालुकाध्यक्ष नानासाहेब शिंदे, जिल्हा संघटक गणेश पारे, तालुका उपाध्यक्ष दिलीप लबडे, तालुका संघटक गोरख घोडके, शहराध्यक्ष विनोद मेहत्रे, उपाध्यक्ष दिपक साबळे, सागर हिरडे, चि. निल कापसे व वीरधवल जरे इ.पदाधिकारी उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading