आदिवासी समाजाची मोठी लोकसंख्या असलेले भिंगाणगाव चार दिवस अंधारात.. वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा तडाखा..

दिनांक १७ मे २०२४, श्रीगोंदा:

भिंगाण खालसा, दुमाला, गावाला मंगळवार दिनांक १४ मे २०२४ रोजी दुपारी ४:०० वाजता वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा तडाखा बसला. गावातील संतोष लोखंडे यांच्या घरावर मोठे झाड ऊनमळून पडले. त्यामुळे त्यांचे राहते घराचे मोठे नुकसान झाले झाले आहे. तसेच, गावाच्या लगत बबन निवृत्ती शिंदे यांचे कुक्कुटपालन अक्षरशा: जमीनदोस्त झाले आहे. राजू शेळके यांचे घराची पडवी उडून गेली, तर गावातील मेन लाईन सह उपलाईन पोल जमीन दोस्त झाले आहेत.

महेंद्र शेंडगे यांच्या घरावर लाईटच्या तारा पडल्या आहेत. चार दिवस झाले गाव अंधारात आहे. गावच्या तलाठी निकाळजे मॅडम यांनी तीन ठिकाणी जाऊन पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल पाठवले आहेत. गावामध्ये वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे स्थानिक सांगत आहेत. गावचा विज पुरवठा पूर्वरत कधी होईल..? भिंगाण गाव अंधारातून उजेडात कधी येईल..? याबाबत स्थानिक रहिवासी मोठी काळजी व्यक्त करीत आहेत. येथील संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ता नाना शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

बबन निवृत्ती शिंदे यांनी बँकेचे मोठे कर्ज काढून कुक्कुटपालन उभा केलते. मात्र, निसर्गाने साथ सोडली..! अन क्षणात होत्याचे नव्हते  झाले. भविष्यात कसे जगावे याची आम्हास भ्रांत पडली आहे. शासनाने आम्हाला योग्य मदत द्यावी.. अशी कळकळीची विनंती शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading