श्रीगोंदा बैलगाडा असोशिएशन आणि तरुणांच्या पुढाकाराने दि.२० मे रोजी औटी वाडीत भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन.. पारंपरिक खेळांना चालना देण्यासाठी मैदानाचे आयोजन..

दिनांक १९ मे २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील तरुण पदाधिकारी आणि बैलगाडा अशोशिएशनच्या पुढाकाराने दिनांक २० मे २०२४ रोजी दुपारी १२:०० वाजता श्रीगोंदा – जामखेड रोड वरील औटी वाडी येथील मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनेक पारंपरिक खेळ आणि स्पर्धा लोप पावत चाललेल्या आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे मैदानी खेळ संपुष्टात येऊन, शाररिक विकलांगता वाढत असताना, पुन्हा या जुन्या आणि मातीतल्या मैदानी खेळांची आवश्यकता निर्माण झाल्याचे मत बैलगाडा शर्यतीचे आयोजकांनी व्यक्त केले आहे. त्यालाच दुजोरा देत श्रीगोंदा शहरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून, जुन्या खेळांना चालना देण्याचा प्रयत्न केला असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

त्यासाठी दिनांक २० मे २०२४ रोजी औटी वाडी येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान भरवले आहे. शहरातील ही पहिलीच स्पर्धा असून, यापुढे हि परंपरा अविरत चालू ठेवण्याचा आयोजकांचा मानस आहे. यासाठी अनेक अडचणींना तोंड देत हा उपक्रम राबवण्यात आला असुन, प्रेक्षकांनी आणि बैलगाडा प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घेत शर्यतीचा आनंद घ्यावा.. असे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटीच्यां अधीन राहून २० मे रोजी दुपारी १२:०० वाजेपर्यंत नोंद होणाऱ्या स्पर्धकांनाच स्पर्धेत सहभागी होता येईल. यासाठी १०००/- रुपये प्रवेश फी आकारली जाणार आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम ५१०००/-, द्वितीय ३१०००/-, तृतीय २१०००/- पासून ५०००/- पर्यंत बक्षीस दिले जाणार आहेत.

निर्णय देण्यासाठी नामांकित आणि अनुभवी पंच बोलवण्यात आले असुन, प्रशासकीय मान्यतेने स्पर्धा संपन्न होणार आहे. यावेळी संभाव्य दुर्घटनेची जबाबदारी बैलगाडा मालकाची राहणार असून, काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह आपत्कालीन वैद्यकीय परस्थितीसाठी दोन खाजगी रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या असून, पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. सदरील बैलगाडा शर्यत/स्पर्धा रोमहर्षक होणार असल्याने पंचक्रोशीसह तालुका/जिल्ह्यातील नागरिकांनी, बैलगाडा प्रेमींनी या मैदानाचा आनंद घ्यावा.. असे त्यांनी नमुद केले आहे.

तालुक्यातील सामाजिक, राजकिय आणि विवीध क्षेत्रातील नामांकित मान्यवर या बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी येणार असल्याचे आयोजक आणि असोशिएशनचे राहुल वडवकर, रोहीत गोंधळी, भाऊसाहेब औटी, महेश पोकळे, दिपक पिंपळे, गणेश पिंपळे, सागर लबडे, गणेश वडवकर, नितिन शेंडगे सह पदाधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

मैदानाची पाहणी करताना आयोजक..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading