श्रीगोंदयात दोन जणांची आत्महत्या..! अकस्मित मृत्यूची नोंद..

दिनांक २७ ऑगस्ट, श्रीगोंदा:

तालुक्यातील सिद्धार्थनगर तसेच श्रीगोंदा फॅक्टरी या ठिकाणी दोन युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, नमूद प्रकाराने तालुक्यात मात्र, खळबळ उडाली आहे.

श्रीगोंदा फॅक्टरी येथील रवींद्र रामभाऊ ससाने (वय ३२ वर्ष) यांनी राहते घराचे लोखंडी पाइपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर, सिद्धार्थनगर श्रीगोंदा कुणाल रवींद्र घोडके (वय २२ वर्ष) याने राहते घराचे लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन, आपली जीवनयात्रा संपवली आहे.

याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, दोन्ही इसमांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु, याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस सखोल चौकशी करत असल्याची माहिती मिळत आहे.

पोलीस स्टेशनचे (सपोनि) दिलीप तेजनकर आणि (पोना) खारतोडे, (सफौ) भैलुमे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या दोन्ही घटनांचा पुढील तपास (पोना) खारतोडे, (सफौ) भैलुमे हे करीत आहेत.

तालुक्यातून या घटनांबाबत वेगवेगळ्या चर्चा ऐकण्यास मिळत असून, श्रीगोंदा पोलीस लवकरच सदरील प्रकरणांचा छडा लावतील. अशी आशा व्यक्त होत आहे.

स्रोत:(अकस्मित मृत्यू नोंद.. पोलीस ठाणे, श्रीगोंदा)

प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading