तलवार बाळगल्या प्रकरणी , भारतीय शस्त्र कायद्यानुसार दोन युवकांवर,श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा दाखल..

दिनांक १८ मे,श्रीगोंदा:

१७ मे रोजी ११:४५ वाजनेच्या सुमारास (पोलीस निरीक्षक) डी. एस. जाधव यांनी पोलीस नाईक व्ही.आर.वैराळ, पो.कॉ. एस.बी.कोतकर व पो.कॉ. आर.बी.भोर यांना बोलावुन कळवीले की , गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली आहे. दोन इसम हे त्यांचे मो.सा.एम.एच. १६ सी.आर. ५४९८ वर बसुन स्वत:च्या कब्जात तलवार बाळगुन, घोडेगाव रोडने श्रीगोंदाकडे येत आहेत. तेव्हा पोलीस नाईक वैराळ यांनी लागलीच कारवाई कामी दोन पंच व पोलीस पथक रवाना केले.

घोडेगाव रोडने जातांना, महाराजा टिंबर या प्लायवुड दुकानासमोर रोडवर मो.सा.एम.एच.१६ सी आर ५४९८ या मोटार सायकलजवळ दोन इसम उभे होते. पंच व पोलीसांची खात्री होताच, पोलीसांनी १२:३० वा. छापा टाकला. सदर इसम पोलिसांना पाहून पळु लागले, पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले.

दत्तात्रय मच्छिद्र मेहेत्रे (रा.मेहेत्रेवस्ती औटेवाडी ता.श्रीगोंदा) व आदिनाथ छगन हिरडे, (रा. हिरडेमळा औटेवाडीजवळ श्रीगोंदा) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

याठिकाणी सदर ईसमांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, आदिनाथ छगन हिरडे याचे पाठीवर शर्टच्या आतील बाजुस एक लोखंडी तलवार मिळुन आली आहे. सदरची तलवार उमेश वेताळ (पुर्ण नाव माहीत नाही) रा. लिपंणगाव ता. श्रीगोंदा याची असुन, त्याने आमच्याकडे दिली होती. आज रोजी परत मागितली असल्याने, त्यास देण्यास चाललो असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल आदिनाथ छगन हिरडे याने माझी असल्याचे सांगितले असून, यावेळी पोलिसांनी २०० रुपये किमतीची लोखंडी तलवार व ५० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची शाईन गाडी ताब्यात घेत, आरोपीं विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यात यापूर्वी ही अनधिकृत शस्त्र बाळगल्या प्रकरणी काही इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, तलवार ही लग्नसमारंभ, वाढदिवस यात वापरण्याची चालरीत असल्याचे त्यावेळी बोलले होते. मात्र, आत्ता लॉकडाऊन असल्याने कोठेही लग्नसोहळा होतांना दिसत नाहीत. तर या बहाद्दरांनी नेमकी कश्यासाठी तलवार आणली होती? हे तपासात निस्पन्न होईलच.

तलवार व गावठी कट्टा वापरल्या प्रकरणी तत्कालीन सिंगम पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तपासाची चक्रे फिरवित विहिरीतुन पिस्तुल बाहेर काढल्याचे तालुक्याला माहीत आहे. तसेच, त्यांची दबंग कारवाई ही सर्वांना माहीत आहे. बऱ्याच कालखंडा – नंतर आज तलवार प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले असून, तपास चक्र कोठे जाऊन पोहोचतात ? हे सर्वांना लवकरच समजेल.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading