RPI(A)च्या शहराध्यक्ष पदी विशाल घोडके यांची निवड..

दिनांक ३० मार्च,श्रीगोंदा:

तालुक्यात फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेने काम करणारे विशाल गौतम घोडके यांच्या कामाची दखल घेत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाने त्यांना श्रीगोंदा शहराध्यक्ष पदी निवड करीत, काम करण्याची संधी दिली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी घोडकेंना नियुक्ती पत्र दिले आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

दिलेल्या पत्रात विशाल गौतम घोडके, राहणार सिद्धार्थनगर, श्रीगोंदा यांनी आजपर्यंत केलेल्या समाजकार्याची दखल घेऊन, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या विचारा सोबत काम करत असल्याने तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाचे सच्चे कार्यकर्ते असल्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या श्रीगोंदा शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व जाती-धर्माच्या बांधवांना सोबत घेत, सामाजिक सलोखा ठेवून, पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करावा. यासाठी पुढील वाटचालीस पक्षाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.(Vishal Ghodke elected as City President of RPI (A).)

त्यांच्या निवडीबद्दल सामाजिक, राजकीय क्षेत्रासह विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा देत, अभिनंदन केले आहे. सुनिल साळवे (जिल्हाध्यक्ष, अहमदनगर) यांनी विशाल घोडके (शहराध्यक्ष) यांना नियुक्ती पत्र देताना त्यांच्यासोबत प्रविण उर्फ (पप्पू) घोडके, राज जगताप, श्रीकांत घोडके सह कार्यकर्ते उपस्थित होते.

स्रोत:(नियुक्ती पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading