अधिकारी हप्ते घेतात आणि वाहन सोडून देतात.पोलिस काय करतात?:आ.पाचपुते..
01 mins
अवैध वाळूउपशाचा धंदाच मोडीत काढा.. आ.पाचपुते..
दिनांक २५ फेब्रुवारी,श्रीगोंदा/अहमदनगर:
जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असून,पोलिस आणि महसूल अधिकार्यांच्या पाठबळावर वाळूूतस्करांनी दहशत निर्माण केली आहे.असा आरोप खासदार सदाशिव लोखंडे आणि आमदार बबनराव पाचपुते यांनी या बैठकीत केला.
अवैध वाळूउपसा आणि वाहतूक तत्काळ मोडून काढा.असे निर्देश राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी अधिकार्यांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दिनांक२१ रोजी पालकमंत्री मुश्रीफ यांनी विकास कामाचा आढावा घेण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती.
यावेळी(नगरविकास व उर्जा राज्यमंत्री) प्राजक्त तनपुरे,(जिल्हा परिषद अध्यक्षा)राजश्री घुले,(खासदार) सदाशिव लोखंडे,डॉ.सुजय विखे पाटील, (आमदार) बबनराव पाचपुते,डॉ.सुधीर तांबे,आशुतोष काळे,लहू कानडे,(जिल्हाधिकारी)राहुल व्दिवेदी,(अपर जिल्हाधिकारी) पिराजी सोरमारे आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अधिक दहशत
वाळू धंदा राजरोसपणे सुरु असून,नक्षलवाद्यांपेक्षा जादा दहशत या वाळूतस्करांची ग्रामीण भागात निर्माण केली असल्याचा आरोप आमदार पाचपुते यांनी केला.अधिकारी हप्ते घेतात आणि सोडून देतात. नगरचे पोलिस काय करतात?असा सवाल उपस्थित करत त्यांनी,पोलिस आणि महसूल अधिकार्यांच्या कामाचे वाभाडे काढले.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी या आमदार,खासदारांच्या आरोपाची दखल घेत वाळूतस्करी मोडीत काढा.असे निर्देश जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना दिले.आवश्यकता वाटल्यास अधिकार्यांना निलंबित करण्यास देखील मागेपुढे पाहू नका.अशी सूचना देखील त्यांनी या बैठकीत केली आहे.
पैसे काढण्याचे काम
श्रीगोंदे तालुक्याबरोबरच इतर तालुक्यांतील रस्ते खराब झाले आहेत.रस्ते दुरुस्त करण्याऐवजी पैसे काढण्याचे काम सार्वजनिक विभागाचे अधिकारी करत असल्याचा आरोप आमदार पाचपुते यांनी केला. श्रीगोंदा तालुक्यातील रस्ते तपासणी करण्याचे आदेश पालकमंत्री मुश्रीफ यांनी बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मोहिते यांना दिले आहेत. (वृत्तसंस्था)