श्रीगोंदा, १९ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे पती-पत्नीच्या वादातून उफाळलेल्या हिंसाचारात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पतीने स्वतः श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हजर होऊन आपल्या कृत्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीच्या वादादरम्यान मध्यरात्री पतीने पत्नीला लाकडाने मारहाण केली. या मारहाणीत पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पतीने ही माहिती स्वतः पोलीस ठाण्यात येऊन दिली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

मयत महिलेची आई मुंबईत राहणारी असून ती श्रीगोंदा पोलीस ठाण्यात येताच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस कसून करत असून सर्व पुरावे आणि साक्षीदार तपासण्याचे काम सुरू आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनूसार)



जाहिरात..
