दिनांक १४ जून(येळपणे,श्रीगोंदा):
तालुक्यातील येळपणे गावातील खंडेश्वर महाराज मंदीरातील सुमारे १ लाख ७० हजार रुपये किमंतीचा चांदीचा मुखवटा व सोन्याचे दागिने चोरिला गेले आहेत.ही घटना रविवारी मध्यरात्री घडली.
घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिस निरीक्षक अरविंद माने हे रविवारी सकाळी सात वाजता घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक दाखल झाले होते.खंडेश्वर महाराजांसाठी पाच किलो वजनाचा चांदीचा मुखवटा व दोन तोळे सोन्याचे दागिने होते.मंदीराचे जिर्णोद्धाराचे काम गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे. चांदीचा मुखवटा चोरीस गेला ही बातमी रविवारी सकाळी गावात पसरल्यावर भाविकांनी मंदीर परिसरात मोठी गर्दी केली होती.
फिर्यादी किसन शंकर साबळे वय ६० धंदा शेती (खंडोबा मंदीर पुजारी) रा.येळपणे यांच्या माहितीनुसार अज्ञातांविरोधात गुरूनं २०८/२०, भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार खंडोबा मंदिर दरवाजाचे बाहेरील कडी कोंढा कुलुप तोडुन, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमती शिवाय मंदिरात प्रवेश करुन १ लाख ७० हजार रुपये कीमतीचे सोन्या/चांदीचे दागिने व पितळी मु़खवटे,लहान/मोठे घोडे, मंगळसूत्र, बदाम, इन्वर्टर, अँम्पली़फायर इत्यादी साहित्य चोरुन नेले आहे.या फिर्यादीवरुन बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपविभागीय अधिकारी संजय सातव घटनास्थळी दाखल झाल्यावर चोरीचा लवकरात लवकर तपास लावावा,अशी मागणी येळपणे पिसोरे ग्रामस्थांनी केली आहे.
