भिंगाणमध्ये ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू…

दिनांक २१ जुलै २०२४,भिंगाण, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण येथे एका ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतकाची ओळख किशोर उर्फ भाऊसाहेब सुभाष गायकवाड (वय ३०) अशी आहे. किशोर आपल्या कुटुंबासह भिंगाण येथे राहत होता. त्याचे वडील सुभाष गायकवाड आणि पत्नी अनुसया गायकवाड हे मजुरी करून उपजीविका करतात.

दिनांक २० जुलै २०२४ रोजी सकाळी सुभाष गायकवाड, टाकळी कडेवळीत येथे उस लागवडीच्या कामासाठी गेले होते आणि त्यांची पत्नी अनुसया आपल्या माहेरी राहुरी येथे गेली होती. किशोर घरात एकटा होता. सकाळी ११:०० वाजता दत्तप्रत्राद उर्फ बाबु जगन्नाथ अधोरे यांनी किशोरला ट्रॅक्टरवर मजुरीच्या कामासाठी बोलावले.

त्यानंतर दुपारी २:०० वाजता किशोरचे वडील सुभाष गायकवाड यांना त्यांच्या भावजय सविता संजय गायकवाड यांनी फोन करून सांगितले की, किशोरला ट्रॅक्टर अपघातात गभीर इजा झाली आहे. हे ऐकताच सुभाष तातडीने टाकळी कडेवळीत येथून निघून भिंगाणला आले. त्यांनी घटनास्थळी पोहोचल्यावर किशोरला रस्त्यावर गंभीर अवस्थेत पाहिले.

किशोरला तातडीने अॅब्युलन्सद्वारे श्रीगोंदा सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये मृ.रजि.नं नुसार करुन, भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत करण्यात आली आहे. या अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे.

स्रोत:(श्रीगोंदा पोलीस स्टेशन)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading