अुनसूचित जातीच्या विद्यार्थ्या चे प्रलंबित अर्ज निकाली काढावे …

अुनसूचित जातीच्या विद्यार्थ्या चे प्रलंबित अर्ज निकाली काढावे

            अहमदनगर दि.24 – सन 2011 ते 2017  या कालावधीतील अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्‍याचे भारत सरकार मॅटि्कोत्‍तर शिष्‍यवृत्‍ती/ फ्रीशिपचे अर्ज ऑनलाईन भरलेले आहेत. अशाच सर्व विद्यार्थ्‍याचे अर्ज अद्यापही महाविद्यालय स्‍तरावर मोठया प्रमाणात प्रलंबित असल्‍याचे निदर्शनास येत आहेत.  याबाबत समाज कल्‍याण विभागाने वारंवार सर्व महाविद्यालयांना आवाहन करुनही महाविद्यालयीन स्‍तरावर शिष्‍यवृत्‍तीचे अर्ज  प्रलंबित ठेवण्‍यात आले आहेत. महाईस्‍कॉल पोर्टल काही मर्यादित कालावधीकरीताच सुरु असल्‍याने महाविद्यालयीन स्‍तरावरील ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्‍याबाबत आवाहन करण्‍यात येत आहे. 

            सन 2011-12 पासून राज्‍यामध्‍ये महाविद्यालय स्‍तरावर एकूण 1 लाख 42 हजार 228 अर्ज  प्रलंबित आहेत. ते निकाली काढण्‍यासाठी विशेष माहिम राबविण्‍यात येत आहे. दिनांक 27 सप्‍टेंबर 2018 ते 6 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत सर्व महाविद्यालयांनी  संबंधित सहाय्यक आयुक्‍त समाज कल्‍याण यांच्‍याकडे प्रलंबित पात्र व परिपूर्ण अर्ज व बी स्‍टेटमेंट ऑनलाईन सादर न केल्‍यास  सदरचे प्रलंबित अर्ज रद्द झाल्‍याचे समजण्‍यात  येतील व अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीमधून काढून टाकण्‍यात येतील.

 तसेच ज्‍या विद्यार्थ्‍याची प्रलंबित असेलेली शिष्‍यवृत्‍ती, शिक्षण फी अदा करण्‍याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची असेल व याबाबत सामाजिक न्‍याय  विभागाची जबाबदारी राहणार नाही याची सर्व संबंधीत महाविद्यलयाच्‍या प्राचार्यानी गंभीर दखल घ्‍यावी, असे समाज कल्‍याणचे सहाय्यक आयुक्‍त पांडूरंग वाबळे यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

                                                            

Leave a Reply