दिनांक २५ सप्टेंबर
दि २२/०९/२०१८ शनिवार या दिवशी भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीची वतीने २२/९/२०१८ ला होऊ घातलेल्या नगर जिल्ह्यातील एक दिवसीय धरणे आंदोलनाबाबतची रूपरेषा ,नियोजन करण्यासाठी अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे नियोजन बैठक घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वडार समजातील समाजसेवक आपले भटके बंधू आदरणीय भरतजी विटकर साहेब यांच्या मातोश्रींना हक्क परिषदेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तदनंतर धरणे आंदोलनाच्या* *नियोजनाबाबत चर्चा करण्यात येऊन नियोजन करण्यात आले धरणे आंदोलन यशस्वी होण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेतून सर्वानी प्रयन्त करणे गरजेचे असल्याने सर्वानुमते ठरविण्यात आले बैठकीनंतर हक्क परिषदेच्या अजेंड्या प्रमाणे आपल्या जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीना निवेदने देणे आवश्यक असल्याने नगर चे लोकप्रिय खासद्सर मा दिलीपजी गांधी साहेब व गटनेते सुरेंद्रकुमार गांधी साहेब यांना धरणे आंदोलनाचे निवेदन देण्यात आले व केंद्रीय दादा इधाते आयोग मंजूर होण्यासाठी व भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांबाबत लोकसभेत आपण चर्चा घडवून आणावी अशी मागणी हक्क परिषदेच्या वतीने करण्यात आली यावेळी.
विभाग सदस्य आदरणीय गोपीचंद इंगळे सर,उपाध्यक्ष सोमनाथ गांगुर्डे सर,सागर गांगुर्डे,नाशिक विभागीय युवा आघाडी अध्यक्ष शिवाजी पोटे सर,संजयजी सावंत सर,जिल्हा अध्यक्ष गोविदाजी तांदळे सर,युवा जिल्हा अध्यक्ष मोहनजी शेगर सर,जेष्ठ मार्गदर्शक बाबूरवजी शिंदे सर,खराडे सर व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वेळी मंडप ,सतरंजी व्यवस्था माळी साहेबकडून व्यवस्था करण्यात आली आहे, तेथील पाणी चहा ची व्यवस्था शेगर सर व कमिटी करणार आहे,आदरणीय गोपीचंदजी इंगळे सर करणार आहेत या सर्व सहयोगी या सामाजिक चळवळीस योगदान करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानण्यात आले .


