बस स्थानकात चोरी करणारे पती-पत्नी मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात..
01 mins
दिनांक १६ फेब्रुवारी श्रीगोंदा: शहरातील बस स्थानक परिसरात वाढत चाललेल्या चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेत, (पोलीस उपविभागीय अधिकारी)संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदयात तपास प्रक्रिया चालू होती. या प्रकरणी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार,बस स्थानकात गेल्या एक महिन्यापूर्वी झालेल्या चोरीच्या अनुषंगाने,श्रीगोंदा बस स्थानकात आष्टी तालुक्यातील पती-पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेत मागील चोरीची चौकशी केली व त्यांनी श्रीगोंदा बस स्थानकात चोरी केल्याचे कबूल केले.
श्रीगोंदा बस स्थानक परिसरात महिलांचे पर्स दागिने चोरीच्या घटना संदर्भात विविध तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत्या.जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील,कर्जत उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक संजय सातव तसेच पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून तपास चालू असतांना. दिनांक १६ फेब्रुवारी रोजी तांत्रिक माहितीच्या आधारे नमूद शाखेकडे सपोनि राजेंद्र सानप,पोहेकॉ अंकुश ढवळे,प्रकाश मांडगे,गोकुळ इंगवले,संजय काळे, योगेश सुपेकर यांनी सापळा रचून श्रीगोंदा बस स्थानक परिसरातुन रामेश्वर नेहऱ्या भोसले व त्याची पत्नी सुनिता रामेश्वर भोसले यास ताब्यात घेऊन विचारपूस केली.त्यांनी गेल्या महिन्यात केलेल्या १५०००/-रुपयांच्या मुद्देमाल चोरीची कबुली दिली.यावरून त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदर आरोपी हे बीड जिल्हा आष्टी तालुक्यातील कानडी गावचे रहिवाशी असून,बस स्थानक व गर्दीच्या परिसरातून महिलांच्या पर्स चोण्यात ते सराईत गुन्हेगार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्याचे स्थानिक पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.