१० रुपये किंमती ची तंबाखू पुढी २० ते ३० रुपयांना विक्री…

दिनांक १२ एप्रिल,श्रीगोंदा:

लॉकडाऊन असल्याने माल मिळत नसल्याचे कारण देत किराणा दुकानदारांकडून १० रुपयांची तंबाखू पुडी ३० रुपयांना तर बिडी, सिगारेट वर बंदी असलेल्या गुटख्याचीही शहरासह ग्रामीण भागातही दुप्पट दराने विक्री करण्यात येत आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून अमली पदार्थांच्या विक्रीला बंदी घालण्यात आली असली, तरी गुटखा, तंबाखू, सिगारेटसारखे पदार्थ सहजरीत्या उपलब्ध होत आहेत.त्यामुळे बंदीतही हा माल उपलब्ध कसा होतो? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला करोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी घालण्यात आली असली.तरी, तंबाखू, बिडी, सिगारेटच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. असे असले तरी तल्लफ भागवण्यासाठी हा खर्च सहन करण्याची ग्राहकांची तयारी आहे.

करोनामुळे तंबाखूजन्य पदार्थांची सर्वाधिक विक्री करणाऱ्या पानटपऱ्या सक्तीने बंद केल्या आहेत. तरीही,अनेक ठिकाणी किराणा दुकानांमध्ये ठराविक ग्राहकांना वाढीव पैसे देऊन,अंमली पदार्थ सहजगत्या उपलब्ध करून देण्यात येत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. लॉकडाऊन व बंदीमुळे तंबाखूजन्य पदार्थांचा तुटवडा निर्माण झाल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येते. वाढीव किमतीला होलसेल दरात तंबाखू, सिगारेट, गुटख्याची पाकिटे घेऊन त्यांची सर्रास चढ्या भावाने विक्री सुरू असून, करोना संसर्गापासून लोकांचे आरोग्य जपण्याचा शासनाच्या उद्देशालाच दुकानदारांकडून हरताळ फासला जात आहे.तालुक्यात काही भागात अश्या पद्धतीने चाललेले प्रकरणे स्थानिक प्रशासन व माध्यम प्रतिनिधींच्या समोर आलेली आहेत.मात्र पुढे काही कारवाई केली की नाही ? हे मात्र समजू शकलेले नाही.

असे जर कोणी लॉकडाऊनच्या कालखंडात गैरवापर करीत असेल.तर,स्थानिक पोलीस व महसूल प्रशासनास कळवावे.

वार्तांकन-नितीन रोही

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading