श्रीगोंद्यात”दंगल नियंत्रण पथक”.. मोकाट फिरणारांना चांगलेच चोपले..

दिनांक १२ एप्रिल,श्रीगोंदा:

अहमदनगर पोलिस दलाचे दंगल नियत्रंण पथक श्रीगोंदा तालुक्यात दाखल झाले असून, या पथकातील जवानांनी पहिल्याच दिवशी काष्टी, ढोकराई, श्रीगोंदा फॅक्टरी परिसरात रस्त्याने मोकाट फिरणाऱ्या महाभागांना बेदम चोप दिला आहे.

श्रीगोंदा तालुक्यात तीन दिवसाचा कर्फ्यु लावला आहे.तरी काही जण रस्त्याने अथवा गावात चौकात बसतात,अशा नागरिकांना बेदम चोपण्याचे मिशन दंगल नियंत्रण पथकाने हाती घेतले आहे.

दोन दिवसात श्रीगोंदा शहर, बेलवंडी, येळपणे, देवदैठण, कोळगाव, मांडवगण, लोणीव्यंकनाथ, आढळगाव, पारगाव, घारगांव, पिंपळगावपिसा, विसापुर परिसराला अचानक भेट देऊन, मोकाट फिरणाऱ्या नागरिकांचा चांगलाच समाचार घेणार आहेत.

पोलिसांवर पुष्पवृष्टी

श्रीगोंद्यात प्रशासनाने चांगली कामगिरी चालविली आहे.(पोलिस निरीक्षक)दौलतराव जाधव यांनी शनिवारी संध्याकाळी शिवाजीनगर परिसरात भेट दिली असता,त्या परिसरातील महिलांनी पोलिसांवर फुलांचा वर्षाव करीत पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

(वार्तांकन व छायाचित्रे:नितीन रोही)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading