दिनांक १२ एप्रिल, श्रीगोंदा:
शहरासह तालुक्यातील काही गावांना आज संध्याकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले. शहरा सह आसपासच्या परिसरात गारांचा पाऊस पडला. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाचा कहर आज शहरासह तालुक्याच्या काही भागात बरसला. तालुक्याच्या काही गावात गारा पडल्याने,अतोनात नुकसान झाले. त्यामुळे गहू, कांदा, फळबागा पिकांचे मोठे नुकसान झाले.आधीच कोरोना महामारीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असतानाच अवकाळी गाराच्या पाऊस झाल्यामुळे,तो पुरता बेजार झाला आहे.
त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.दरम्यान कालच तालुक्याच्या काही भागात अशाच प्रकारचा पाऊस झाला आहे.त्यातही साधारण माणसानं सह शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे समजते आहे.
