पाण्याचा संघर्ष वंचीत शेतकऱ्यांसाठी, श्रेयासाठी नाही माजी मंत्री बबनराव पाचपुते .

श्रीगोंदा दिनांक १२ डिसेंबर :-

     तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना पिके वाचविण्याच्या दृष्टीने कुकडीचे पाणी सोडण्यासंदर्भात १० नोव्हेंबर रोजी केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत, कुकडीच्या पाण्या संदर्भात सविस्तरपणे चर्चा करण्यात आली होती.त्यानुसार सोडण्यात आलेले पाणी १५ दिवस लवकर सुटल्याने येथील लाभधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मत, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी आज दिनांक १२ डिसेंबर रोजी माऊली या त्यांच्या संपर्क कार्यलयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना मांडले आहे.शिवाय पाण्याचा संघर्ष वंचित शेतकऱ्यांसाठी असून श्रेयासाठी किंवा राजकारनासाठी नसल्याचे ही बबनराव पाचपुते यांनी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने विशेष नमूद केले आहे.
     कुकडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां बरोबर भेट घेऊन साडेतीन टी. एम. सी. मध्ये शेतकऱ्यांचे भागत नसल्याने अतिरिक्त एक टी. एम.सी.पाणी वाढवन्याच्या सूचनेला मान्य करण्यात आले असल्याचे पाचपुते यांनी नमूद केले आहे.श्रीगोंदयाच्या पाण्यात पाच दिवसांचा वाढ केली असून आणखी तीन दिवस पाणी चालणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
   
    दुष्काळ योजना,छावणी, पाणी टँकर ,न.रे.गा ,म.न.रे.गा.मध्ये मिळेल त्याला कामं देण्यात यावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.वरील नमूद सर्वच बाबींची चर्चा करीत पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने अग्रेसर राहणार असल्याचेही पाचपुतेनी यावेळी नमूद केले आहे.१३२ चारीचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असून ,त्यासाठी पाठपुरावा चालू असल्याचे त्यांनी पत्रकारांना बोलतांना सांगितले.
     त्याचबरोबर श्रीगोंदा आगारात पाच शिवशाही बसेस गाड्यांचा समावेश करण्यात यावा यासाठी मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन त्यांना याविषयी मागणीचे पत्र सादर केले असून,त्यांनी याविषयी लवकरच मागण्या ची पूर्तता करणार असल्याची माहिती पाचपुते यांनी माध्यमांना दिली आहे.

Leave a Reply