नागरिक आणि महिलांची कचरा डेपो हटविण्याची मागणी …

प्रतिनिधी /श्रीगोंदे —

      श्रीगोंदे नगर पालिकेच्या भिंगाण रस्त्याच्या बाजूला असलेल्या जुन्याच कचरा डेपो मधे प्रस्तावित असलेल्या पावणे तीन कोटी खर्चाचा अद्ययावत घनकचरा प्रकल्पाचे कामांचे उद्घाटन करण्यापुर्वीच स्थनिक नागरिक आणि महिलांनी कचरा डेपो हटविण्याची मागणी करत ,तेथे होत असलेल्या या प्रकल्पाला विरोध करत, आज सोमवारी काळे झेंडे दाखवले . यावेळी, नगराध्यक्ष मनोहर पोटे यानी स्थानीकांचे सर्व प्रश्न सोडवण्यात येणार असुन या प्रकल्पात कचरा विघटन होणार असल्याचे संगितले.

      आता नगरपालिकेचा याच ठिकाणी 2.75 कोटी चा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारला जाणार आहे . पहिलाच कचरा डेपो हटविण्याची मागणी तेथे होत असल्याने, या प्रकल्पाला विरोध करीत नागरीकांनी प्रकल्पाचे भुमिपुजन होण्यापुर्वीच हातात काळे झेंडे दाखवत नगरपालिका समोर निषेधार्थ रांगोळी काढण्यात आली . कामाचे उदघाटन रद्द करण्यात आल्याने आंदोलक थेट नगर पालिकेत आले व तेथे नगराध्यक्ष मनोहर पोटे यांना निवदेन देले . या प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितले. यावेळी हरिभाऊ शिंदे, नीतीन रायकर, संतोष रायकर, पल्लवी रायकर, जयश्री रायकर, आदी सह स्थानिक उपस्थितीत होते.

      नगराध्यक्ष मनोहर पोटेे यांनी या ठिकाणच्या अडचणी दूर करु प्रकल्प झाल्यावर त्या परिसरात कुठलीही समस्या राहणार नाहीत. लवकरच हा प्रकल्प सुरु होणार असून ,अद्यायावत पध्दतीने कचऱ्यावर प्रक्रिया होणार असल्याने नागरीकांनी सहकार्य करावे असे सांगितले.
Show quoted text

Leave a Reply