बेलवंडी चे मंडळ कृषी अधिकारी श्री.आबासाहेब भोरे व कृषी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम , मुख्यमंत्री सहायता निधीला ११११११ चा मदतनिधी..

दिनांक १५ मे,(बेलवंडी,श्रीगोंदा):

कोरोनाच्या संकटात कृषि महाविद्यालय बदनापूर च्या माजी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला रु. ११११११ (एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये) मदत केली आहे.

सध्या कोरोना विषाणूं ने थैमान घातले आहे.देशा मध्ये महाराष्ट्रला जास्त फटका बसला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत व राज्याचा एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखुन बदनापूर कृषि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्धीनी राज्य सरकारला तब्ब्ल एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची आर्थिक मदत ऑनलाईन स्वरूपात प्रदान केली.

विविध शासकीय पदावर अधिकारी, बँकिंग अधिकारी, शेतकरी, बियाणे कंपनीत अधिकारी, बाहेर देशात असणारे काही अधिकारी, कृषि उद्योजक असलेल्या माजी विध्यार्थानी आपल्या ‘बीडीएन कट्टा’ या ग्रुपच्या माध्यमातून राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत ग्रुप मधील सहकाऱ्यांनी एकमेकांशी चर्चा करून, दोनच दिवसात ११० विद्यार्थ्यांनी मदत करण्याचे निश्चित केले.

महाराष्ट्र शासनाने याची दखल घेत आभाराचे पत्र बीडीएन ‘कट्टा ग्रुप’ ला पाठविले आहे. यासाठी मंडळ कृषि अधिकारी श्री. आबासाहेब भोरे, श्री. शरद देशमुख, श्री.अमृत दहातोंडे, श्री. सुधीर चव्हाण, श्री. अशोक सव्वाशे, श्रीमती रुपाली भगत यांनी परिश्रम घेतले.कृषि महाविद्यालय बदनापूर च्या माजी विध्यार्थीनी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(वार्तांकन:पत्रकार अनिल दळवी)

Leave a Reply