तालुक्यातील महादेव वाडी येथील अल्पवयीन मुलीला घरात घुसून मारहाण करीत विनयभंग, सात जणांच्या विरोधात पोस्को नुसार गुन्हा दाखल…
श्रीगोंदा(प्रतिनिधी) दिनांक १० फेब्रुवारी :
दिनांक ९ फेब्रुवारी रोजी रात्री ९:०० वाजनेच्या सुमारास तालुक्यातील एका गावात आई,वडील आणि बहिणींच्या समवेत वास्तव्यास असणाऱ्या व श्रीगोंदा येथील एका महाविद्यालयात संगणका चा कोर्स करीत असणाऱ्या, अल्पवयीन मुलीचा तिच्या घरात घुसून मारहाण करून कपडे फाडत घरच्यांना जबर मारहाण करून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.सुमारे सात जणांच्या जमावाने ज्यात महिला व काही पुरुष यांनी एकत्र येऊन या अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन तुम्हीं आमच्या माणसांवर गुन्हे दाखल करतात,म्हणत राग अनावर होऊन पीडितेस तिच्या कुटुंबातील लोकांना मारहाण करण्यात आली आहे.
याघटनेनंतर पीडित कुटुंबातील सदस्य श्रीगोंदा पोलीस ठाण्यात येत घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे.यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी नमूद आरोपींच्या विरोधात गु.र.नआय१४५/२०१९भां.द.वि.कलम३५४,३२४,४५२,२९४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४९,बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदा कलम ११(४)१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी नामे शाहरूख(मुबारक)शेख,सादिक शेख,राजू शेख,शाहबाण शेख,शकील शेख, यास्मिन शेख,नूरजहाँ शेख, सर्व राहणार महादेव वाडी तालुका श्रीगोंदा,यांपैकी तीन आरोपी पोलिसांनी अटक केले आहेत.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करीत आहेत.