शेख महमंद महाराज डेअरी च्या दिशेने अनधिकृत शस्त्र घेऊन जाणाऱ्या इसंमाविरोधात भारतीय हत्यार कायद्या नुसार कारवाई…

श्रीगोंदा(प्रतिनिधी)दिनांक ११ फेब्रुवारी:
श्रीगोंदा शहरातील मांडवगण रोड लगत असलेल्या मनोहर पोटे यांच्या मालकीच्या शेख महंमद महाराज डेअरी जवळ, रात्री १०:३० च्या सुमारास १०० ते १५० लोकांचा गैरसंविधानिक जमाव जमल्याचे, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना बरोबर घेत, घटना स्थळी गेले असता, नमूद ठिकाणी मोठा जमाव भांडणाच्या दृष्ट्या उपस्थित दिसला. यावरून पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी व कर्मचाऱ्यांनी चौकशी करीत असताना त्या जमावातून एक इसम नामे अक्षय राजू घोडके राहणार सिद्धार्थ नगर ,श्रीगोंदा याने हातात तलवार घेऊन, शेख महंमद महाराज डेअरी मध्ये  जातांना पाहिल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन, दोन पंचासमक्ष कारवाई करीत ताब्यात घेतले. अक्षय राजू घोडके याच्यावर पोलीस कॉ. अविनाश ढेरे यांच्या फिर्यादीनुसार भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह मु.प्रो.का.क.३७(१)(अ)(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कृत्य अक्षय याने कोणत्या उद्देशाने केले. हे मात्र समजू शकेल नसले तरी. ज्या ठिकाणी हा इसम हत्यारं घेऊन जात होता, ती डेअरी विद्यमान नगरसेवक व नगराध्यक्ष पती मनोहर पोटे यांची आहे.राजकीय वैमनस्य आहे, की सार्वत्रिक दहशत माजवण्यासाठी त्याने हे कृत्य केले हे नक्की समोर आले नाही.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading