चाकू चा धाक दाखवीत चार चाकी गाडी सह साडेचार लाखांच्या वस्तू लुटल्या…

श्रीगोंदा (प्रतिनिधी)दिनांक ११ फेब्रुवारी:
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावात दिनांक १० फेब्रुवारी रोजी रात्री ११:०० वाजता काष्टी दौंड रोडच्या कडेला नैसर्गिक विधी साठी थांबले असतां, समता नगर दौंड येथील रहिवासी दत्तात्रय बंडू ननवरे यांना काष्टी येथील मातोश्री रुग्णालया समोर एका अनोळखी इसमाने चाकूचा धाक दाखवीत लुटले आहे.
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत ननवरे यांनी नमूद केले आहे की,३० हजार रोख रक्कम,१५ हजार रुपये किमतीचा एम आय कंपनीचा मोबाईल,१८शे रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल,४७ हजार रुपये कंपनीचे सोन्याचे दागिने,२३शे रुपये किमतीचे टायम्याक्स कंपनीचे घड्याळ,२ लाख ५० हजार रुपये किमतीची मारुती कंपनीची विको गाडी असा एकूण ३ लाख ४८ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल अन्यात इसमाने चाकूचा धाक दाखवीत चोरून नेला आहे.मारुती विको या गाडीचा नंबर एम एच १२ एन १९१४ असून,अज्ञात इसमा विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आली आहे.या प्रकारांना चा पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करीत आहेत.
Related