पेडगाव ग्रामपंचायत ने साजरा केला वर्धापन दिन…
पेडगाव,श्रीगोंदा दिनांक १३ फेब्रुवारी:
११/०२/२०१८ रोजी पेडगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच मा.सौ. सुलोचना भगवानराव कणसे यांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या सर्व सहकाऱ्यांसह पदभार स्वीकारला.११/०२/२०१९ ला त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. यानिमित्ताने सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी गावातील सर्वच ज्येष्ठ व्यक्तींचा शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला. व गावातील वडिलधार्यांच्या आशीर्वादाने आपल्याला ग्रामपंचायतीवर काम करण्याची जी संधी मिळाली; म्हणून त्यांचे ऋण व्यक्त केले. तसेच गावातील अपंगांना पाच टक्के निधीतून टेबल फॅन व मिक्सर चे वाटप करून त्यांचा यथोचित सन्मान केला.
पेडगाव ग्रामपंचायतीच्या इतिहासात “गावातील सर्वच ज्येष्ठ व्यक्तींचा पहिल्यांदाच सत्कार झाल्याने”, लोकांनी समाधान व्यक्त केले व ग्रामपंचायत बॉडीचे मनापासून आभार मानले .याप्रसंगी गावच्या सरपंच मा.सौ.सुलोचना भगवानराव कणसे ,उपसरपंच देविदास शिर्के, नारायणराव कणसे ,राजेंद्र पंडित ,इरफान काझी, प्रकाश घोडके, संतोष खेडकर, प्रियंका गोधडे, क्षिरसागर गुरुजी, नारायण भाऊ खेडकर, गणपतराव शिर्के, भगवानराव कणसे, विलाससिंह परदेशी, शहाबुद्दीन इनामदार, दत्तात्रय नांदगुडे,भाऊसाहेब खेडकर, विठ्ठल बोबडे,मारुती कदम, कानिफनाथ पवार, साहेबराव दिवटे, युवराज घोडके, आदी मान्यवर व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते..

