छावण्यांच्या नावाखाली धंदा कसा रोखणार ? त्यापेक्षा चाऱ्याचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा –डॉ.सुजय विखे पाटील…

श्रीगोंदा(प्रतिनिधी) दिनांक १३ फेब्रुवारी:
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने एक तर उशिरा चारा छावण्या सुरू केल्या, दुष्काळाची दाहकता शासनाने गांभीर्याने घेतली नाही.चारा छावण्याचा जो अध्यादेश शासनाने काढला त्यामध्ये सुद्धा अटी-शर्ती घातलेल्या आहेत.अशा वेळेस शेतकऱ्याच्या जखमांवर फुंकर घालण्याऐवजी शासन आणि शासनाचे प्रतिनिधी या चारा छावण्या च्या नावाखाली धंदा करणाऱ्याला कसे रोखणार ? त्यापेक्षा चाऱ्याचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा. असे आव्हान, युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले.
घारगाव तालुका श्रीगोंदा येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा सत्कार व अहमदनगर जिल्हा परिषद जनसुविधा योजने अंतर्गत घारगाव येथील रस्त्याचे डांबरीकरण व अहमदनगर जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्ग खोल्यांच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. चारा छावण्या सुरु करण्यासाठी आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर, सरकारला जाग आली. आंदोलनाला काही दिवस बाकी असताना शासनाने छावण्याचा निर्णय घाईगडबडीने घेतला. मात्र,शासनाच्या परिपत्रकामध्ये अनेक जाचक अटी शर्ती आहेत. मोठया आणि लहान जनावरांसाठी ७० रुपये आणि ३५ रुपये प्रत्येकी प्रतिदिन शासनाने निश्चित केला आहे. साधारणपणे तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे अश्या, एका शेतकऱ्याला पाच पेक्षा जास्त जनावरांची नोंदणी करता येणार नाही अशा अनेक जाचक अटी शासनाने लादल्या आहे आधीच ऑनलाइन पूर्तता करता करता शेतकरी ऑफलाईन झाला आहे. त्यामुळे हा खेळ थांबून चारा छावण्यांचा धंदा न करता अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आव्हान आपण मुख्यमंत्र्यांना करणार आहोत. त्यासाठी आजच आपण मुंबईला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
श्रीगोंदा आणि पाथर्डी तालुक्यातील लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक असणारे यापुढील किती वेळा पक्ष बदलले आपल्या सर्वोच्च नेतृत्व व तालुक्याच्या दैवताला कसे फसवले हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे त्यांनी मला पक्षनिष्ठा शिकवू नये असा टोला त्यांनी कोणाचे नाव न घेता लगावला. ज्यांना लोकसभा लढवायची ते कुठल्या मुहूर्ताची वाट बघत आहेत. असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यावेळेस (अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक), दत्ता पानसरे,सौ अर्चना पानसरे बाळासाहेब, हराळ (घारगाव ग्रामपंचायत सरपंच) सर्व ग्रामपंचायत सदस्य सेवा सोसायटीचे सर्व आजी माजी चेअरमन व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading