पाण्यासाठी केलेल्या आमरण उपोषनाला यश… नऊ ठिकाणी टँकर मंजूर…

चांडगाव,श्रीगोंदा दिनांक १३ फेब्रुवारी:
श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात यावेत यासाठी, येथील पीडित ग्रामस्थांनी श्रीगोंदा तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सूर केले .मात्र, पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीरपणे लक्षात घेत जि.प.चे सदस्य अनिल ठवाळ व राजेंद्र म्हस्के यांच्या पुढाकाराने व पंचायत समितीच्या वतीने आलेल्या विस्तार अधिकारी जगताप व नायब तहसिलदार जगताप यांच्या मध्यस्थीने या आंदोलनात मागणी केल्या प्रमाणे नऊ ठिकाणी पाण्याचे टँकर चालू करण्यात आले आहेत.
आज दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सकाळी सुरू केलेले हे आंदोलन, दुपारीच मंजूर झाले.दुष्काळ परिस्थितीमुळे सर्वत्रच पाण्याची भीषणता जाणून लागली आहे.या परस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार, चांडगावच्या ग्रामस्थानी मागणी केली.सकाळी उपोषण बसलेल्या उपोषण कर्त्यांच्या मागणी वर स्थानिक प्रशासनाने तात्काळ कारवाई केली आहे.मागणी प्रमाणे गदादेमळा,विठ्ठलवाडी,हनुमानवाडी,कस्तुरवाडी,विकासवाडी,रसाळमळा,वेताळवाडी,दत्तवाडी,इत्यादी ठिकाणी प्रशासनाने टँकर मंजूर केले.
या आंदोलनात अनिल ठवाळ, राजेंद्र (आबा)म्हस्के,निलेश भाऊ गायकवाड, विलास अशोक म्हस्के,आप्पा पोपट म्हस्के,बाळू म्हस्के,वैभव म्हस्के,संदीप म्हस्के,स्वप्नीम म्हस्के,सह चांडगाव येथील ग्रामस्थ व तरुण विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading