जमिनीच्या वादातून केंद्रप्रमुखास गावगुंडांकडून मारहाण…
श्रीगोंदा दिनांक १६ फेब्रुवारी :
श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील रहिवासी व हल्ली श्रीगोंदा शहरात बालाजी नगर येथे वास्तव्यास असलेले, केंद्रप्रमुख गजाजन ढवळे यांना वारंवार जमिनीच्या व्यवहारात वादातीत असलेल्या रामा घोडके या सिद्धार्थ नगर येथील इसमाने, गावगुंड जमवून मारहाण केली आहे.
सदर घटना दिनांक १४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७:३० वाजनेच्या सुमारस घोडेगाव रोडवर घडली आहे . समजलेल्या माहिती नुसार, गजानन ढवळे हे सामाजीक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून, त्यांची समाजात चांगली प्रतिमा आहे.मात्र चुकीच्या माणसांशी किंवा चर्चा न करता त्यांनी रामा घोडके या इसमाबरोबर जमिनीचा व्यवहार केला.सदर इसम हा वारंवार जमिनी हडपण्यात,दुसऱ्याच्या जमिनीवर अनाधिकारशाहीने अतिक्रमण करन्यात,ज्यात काहीच संबंध नाही त्या क्षेत्रात आपली मालकी दाखवणे,त्या जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत गाळे बांधणे,अनधिकृत बोअरवेल मारणे,अनाधिकाराने बांधकाम करणे,दफन भूमीवर अतिक्रमण करणे,असे कृत्य करीत आला आहे.जर त्याच्या विरोधात कोणी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या वर खोटे गुन्हे दाखल करणे.सदरील प्रकरणात गजानन ढवळे यांना जर फिर्याद दाखल केली.तर,तुझ्यावर एट्रोसीटी(खोटी?) दाखल करण्याची धमकी दिल्याचे समजते आहे.
ढवळे यांनी रामा घोडके याची मागील पार्श्वभूमी लक्षात न घेता हा व्यवहार केला. आणि ते स्वतः यात गुंतत गेले. व शेवटी अपमानित होऊन मारहाणीला सामोरे गेले.
सदर प्रकरणी रामा घोडके याने गुंड प्रवृत्तीचे इसम जमा करून ढवळे यांच्या कडून घेतलेल्या जमिनीचा व्यवहार अपूर्ण ठेऊन, त्या जमीनीवर आपला अधिकार दाखवीत अनधिकृत पणे खुणा करीत असताना, ढवळे यांनी त्याला विचारले असता राग अनावर होऊन, गैरसंविधानिक इसम जमा केले.केंद्रप्रमुख ढवळे या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या इसमावर हल्ला करीत पोटात, छातीत तोंडावर लथाबुक्यांनी हाणामार करीत जखमी केले.यावरून श्रीगोंदा पोलिसांत गजानन ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून रामा घोडके व इतर अनोळखी ३ इस्माविरोधात भां.द.वि.कलम ३२३,५०४,५०६,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नमूद इसम पोलीसांनी अटक केला नसून, उमाजी राजे प्रतिष्ठान व रामोशी समाजच्या वतीने रामाच्या अटकेची मागणी होत आहे.काल दिनांक १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी, या प्रकरणी काही लोक गजानन ढवळे यांच्यावर दबाव आणण्यासाठी, एका पुढाऱ्याच्या दारात गेल्याचे समजते आहे.पोलिसांनी वस्तुस्थिती व मागील गुन्ह्यांची स्वरूप तपासून, या प्रकरणी कारवाई करावी अशी वरील नमूद संघटनांची मागणी आहे.
Related