पुलवामा आतंकी हमल्याचा श्रीगोंदा तालुक्यातील नांरिकांकडून निषेध..शहीद जवनानां आदरांजली..

श्रीगोंदा प्रतिनिधी ,दिनांक १६ फेब्रुवारी:

परवा पुलवामा येथे दहशतवादयांनी स्फोटकांनी भरलेली कार भारतीय जवानांच्या गाडीला नेऊन धडकविली .त्यात झालेल्या स्फोटात जवळपास ४० जवान शहीद झाल्याची अधिकृत माहिती भारत सरकारने जाहीर केली आहे. या घटनेनंतर संबंध देशात संतापाची लाट पसरली आहे.
या भ्याड हल्ल्याचा देशातील प्रत्येक नागरिक निषेध करीत असून.आज श्रीगोंदा तालुक्यातील लोकांनी एकत्र येत या घटनेच्या निषेधार्थ पाकिस्तान चा झेंडा जाळला . तशेच शहीद जवानांना भावपुर्ण आदरांजली वाहन्यात आली आहे.काल दिनांक १५ फेब्रुवारी रोजी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने मेनबत्या प्रज्वलीत करीत शहरातुन शांततेत रॅली काढण्यात आली.
तसेच आज दिनांक १६ फेब्रुवारी रोजी माजी मंत्री बबनराव पाचपुते व त्यांच्या समर्थकांनीं यावेळी घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करीत, शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे .देशाच्या प्रधानमंत्र्यानी याविषयी घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे विधान पाचपुते यांनी यावेळी बोलतांना केले आहे. शनीचौक,श्रीगोंदा येथेही शहरवासीयांनी या हल्ल्याचा निषेध करीत,शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली केेली.
दत्ता हिरणावळे ,बाळासाहेब महाडिक ,बाळासाहेब गांधी, बापू गोरे,अनिल औटी,अंबादास औटी सह इतर कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते.
त्याचबरोबर नगराध्यक्ष शुभांगी पोटे,घनश्याम शेलार,संतोष शिंदे,नंदू ताडे,संतोष खेतमाळीस, उपस्थित होते.
बहुजन क्रांती मोर्च्याच्या वतीने विजय गायकवाड, संजय सावंत, सह पदाधिकारी उपस्थित होते. संतोष शिंदे ,नंदू ससाणे, बाप्पू गायकवाड, दादा ठवाळ ,दत्ता वाळके,अशोक खवळे, दिलीप भिसे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading