पोलीस स्टेशन आवारात मेणबत्या लावुन शहीद जवानांना श्रध्दांजली …

पोलीस स्टेशन आवारात मेणबत्या लावुन शहीद जवानांना श्रध्दांजली …

श्रीगोंदा दिनांक १६ फेब्रुवारी :

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये जवानांवर हल्ला होऊन ४२ जवान शहीद झाले. त्या जवानांच्या कुटुंबियांवर दु:खाचा भला मोठा डोंगर कोसळला आहे.   संपुर्ण भारत देश या घटनेमुळे हळहळत आहे. श्रीगोंदा येथे अनेक ठिकाणी श्रध्दांजलीचे कार्यक्रम झाले. दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या वतीने देखील काळकाई चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. पोलीस स्टेशन आवारात मेणबत्या लावुन सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात येऊन पसायदानाने समारोप करण्यात  आला. आपण ही समाजाचे, देशाचे काही देणे लागतो या न्यायाने काही नागरिकांच्या व दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या  सहकार्याने निधी जमा करण्यात आला. तो मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येऊन संबंधीत कुटुंबियांपर्यत पोहोचण्याच्या हेतुने ५१००/-रुपये चा धनादेश श्री.जगताप साहेब(अव्वल कारकुन) यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला. यावेळी दक्षचे अध्यक्ष दत्ताजी जगताप, जेष्ठ संचालक श्रीरंग साळवे, धनेश गुगळे, निसार हकीम, अरविंद कासार व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply