विसापूर मध्ये शहिदांच्या आदरांजली सभेत मद्यधुंद युवकाचे देश विरोधी वक्तव्य;आरोपी विरोधात गुन्हा दाखल. घटनेच्या निषेधार्थ गाव बंद…
विसापूर,श्रीगोंदा,दिनांक १९ फेब्रुवारी:
काल दिनांक १८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी तालुक्यातील विसापूर येथे शहीद जवानांच्या आदरांजलीच्या सभेत(कॅडंल मार्च)च्या दरम्यान एका मद्यधुंद युवकाने भारत देशाविरोधात वक्तव्य केले आहे.त्याच्या या विकृत वक्तव्या मूळे विसापूर गावात बराच काळ तणाव निर्माण झाला. यानंतर या युकाचा स्थानिकानी चांगलाच समाचार घेतल्याचे समजले आहे.रात्री या विषयावर स्थानिक पातळीवर चर्चा होऊन,कालच हा विषय मिटवण्यात आला.मात्र सकाळी पुन्हा या घटनेवर गावात चर्चा सुरू होऊन तणाव निर्माण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार विसापूर गावात या घटनेमुळे संबंधित युवकावर,देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली.
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे दिनांक १८ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या आतंकी हल्ल्यात स्फोटात ४० हुन अधिक भारतीय जवान शहीद झाले.देशभर या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केली गेली .देशासाठी बलिदान देणाऱ्या शाहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.अश्याच प्रकारे भारतीय वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित सभेत,येथील जब्बार अमीर सय्यद या इसमाने मद्यधुंद अवस्थेत देशविरोधी वक्तव्य केले.या वक्तव्या मुळे विसापूर गावात मोठा तणाव निर्माण झाला. या व्यक्ती ने केलेल्या या वक्तव्याचा येथील ग्रामस्थांनी जाहिर निषेध केला. तशेच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले.घटनास्थळी बेलवंडी पोलीस दाखल झाल्यावर, जब्बार सय्यद हा इसम विसापूर मधून फरार झाला. मात्र नागरिकांनी मोठा दबाव निर्माण केल्यानंतर व गावबंद ठेवल्यावर.जब्बार पोलिसांना शरण गेला असल्याचे अधिकृत समजले आहे.त्यावर बेलवंडी पोलीस ठान्यात जब्बार ला चौकशीसाठी नेण्यात आले.त्यानुसार त्याच्यावर १५३ ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे,श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,बेलवंडी पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ इत्यादी उपस्थित होते. या घटनेचा श्रीगोंदा तालुक्यातुन तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक घुगे करीत आहेत.तर,पोलीस कॉन्स्टेबल आबासाहेब झावरे यांनी माहीत दिली आहे.या घटनेनंतर विसापूर व परिसरात शांतता असुन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही अशी खबरदारी पोलीस उप अधीक्षक मुंडे यांनी घेतली आहे.
(सोबत विसापूर ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनास दिलेले निवेदन)

