श्रीगोंद्यातील रविवार पेठ व खाटीक गल्लीतील अनधिकृत बिंगो वर श्रीगोंदा पोलिसांची कारवाई….

श्रीगोंद्यातील रविवार पेठ व खाटीक गल्लीतील अनधिकृत बिंगो वर श्रीगोंदा पोलिसांची कारवाई….

श्रीगोंदा दिनांक २० फेब्रुवारी:

शहरातील खाटीक गल्ली व रविवार पेठ, (शनिचौक) परिसरात काही लोक अनधिकृत बिंगो नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती,स्थानिक प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर नमूद ठिकाणी पंचासमक्ष जाऊन बिंगो खेळ खेळत व खेळवत असलेल्या इसमांवर श्रीगोंदा पोलिसांनी वरिष्ठ कार्यालय व अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार कारवाई केली आहे.
काल दिनांक १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी खाटीकगल्ली व रविवार पेठेतील अड्यांवर छापा टाकला.यावेळी,विक्की विठ्ठल ससाणे,(ससानेनगर),श्याम बाळासाहेब ससाणे,(ससानेनगर,श्रीगोंदा),गणेश बाळासाहेब घोडके (सिद्धार्थ नगर,श्रीगोंदा),महेश शंकर हजारे (श्रीगोंदा),गणेश शंकर राऊत(राऊतनगर,श्रीगोंदा),संतोष बबन खेडकर(खेडकरमळा,श्रीगोंदा)बंडू अश्रू पिंपळे(श्रीगोंदा),रमेश वसंत चव्हाण (श्रीगोंदा),रवींद्र हिरामण ससाणे(ससाणेनगर,श्रीगोंदा),बाप्पू दादाराम कोथिंबीरे(श्रीगोंदा),भाऊ माणिक आनंदकर (आनंदकरमळा,श्रीगोंदा)इत्यादीं बिंगो खेळत असलेल्या इसमानां ताब्यात घेतले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालक कुणाल बाटू शिरवाळे(ससानेनगर,श्रीगोंदा)हा येथून पळून गेला.पोलिसांनी केलेल्या झाडाझडतीत रोख रक्कम, बिंगो खेळासाठी वापरले जाणारे दोन कॉम्पुटर व सहा मोटार सायकल असा एकूण १लाख,९३ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा,अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील,पोलीस उप विभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे व श्रीगोंदा पोलीस चे निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई कर्णवार,पो.ना. करडे, पो.ना.भारत खारतोडे,पो.कॉ.योगेश सुपेकर,पो.कॉ.घोळवे,पो.कॉ.किरण भापकर,चालक पो.हे.कॉ. औटी इत्यादी या कारवाईत समाविष्ट होते.कारवाईत पकडलेल्या सर्वांवर मुंबई जुगार बंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते आहे.

Leave a Reply