भविष्यात गटबाजीला गटबाजीतुनच उत्तर देऊ – राजेश डांगे यांचा इशारा.

भविष्यात गटबाजीला गटबाजीतुनच उत्तर देऊ – राजेश डांगे यांचा इशारा.

श्रीगोंदा दिनांक,२० फेब्रुवारी – केवळ आम्ही स्व.पद्मभुषण खा.बाळासाहेब विखे आघाडीचे असल्यानेच, येथील काँग्रेस ने नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र. ४ ब मधुन मला उमेदवारी नाकारली, व स्वीकृत नगरसेवक पदासाठी देखील उमेदवारी नाकारल्याचा आरोप, नगरसभा आंदोलन चे अध्यक्ष राजेश डांगे यांनी न.पा उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीनंतर केला.
       डांगे म्हणाले माझे वडील कुकडी सहकारी कारखाण्याचे जेष्ठ संचालक ऍड. -सुभाष (दादा) डांगे गेल्या ४० वर्षापासुन विखे यांचे अत्यंत विश्वासु ,विखे समर्थक म्हणुन जिल्ह्यात परिचीत असल्याने, तालुक्यातील थोरात प्रणित काँग्रेसने मला कॉगेसचा बालेकील्ला असलेल्या प्रभाग क्र..४ मधुन उमेदवारी नाकारली.माझी आई सौ.रतन डांगे यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, ना.राधाकूष्ण विखे पा.यांचा आदेश येताच, आम्हीं काँग्रेस उमेदवार विजयी व्हावा म्हणुन, उमेदवारी अर्ज मागे घेतला.नाहीतर मतांची विभागणी होवुन काय झाले असते? हे सर्वसूत आहे.आम्हीं पक्षाचा विचार केला. पण,पक्षाने माझ्या बाबतीत गटाचा विचार केला हे दुर्दवी आहे.स्वीकृत पदासाठी देखील ना.राधाकूष्ण विखे,जि.प अध्यक्षा. सौ शालीनी ताई विखे यांनी येथील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आग्रह धरला होता. पण स्थानिक नेत्यांनी दाद दिली नाही.दोन्हीं वेळेस केवळ विखेंचे कार्यकर्ते या निकषांवर अन्याय केल्याचे, सांगुन ८ दिवस सतत स्थानिक नेत्यांकडे पाठपुरवठा करताना, प्रत्येक नेता माझ्या हातात काही नाही. असे आम्हांला सांगत होते. मग आजच्या निवडी कोणाच्या हातात होत्या ? हे न कळण्या इतके दुधखुळे आम्हीं मुळीच नाही. भविष्यात गटबाजीला गटबाजीतुनच उत्तर देऊ असा इशारा राजेश डांगे यांनी दिला.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading