श्रीगोंदा न.पा.च्या स्वीकृत नगरसेवक पदी भाजपाचे महावीर पटवा तर आघाडीचे समीर बोरा.उपनगराध्यक्ष पदी अशोक खेंडके यांची निवड…

श्रीगोंदा न.पा.च्या स्वीकृत नगरसेवक पदी भाजपाचे महावीर पटवा तर आघाडीचे समीर बोरा.उपनगराध्यक्ष पदी अशोक खेंडके यांची निवड…

श्रीगोंदा दिनांक ,२० फेब्रुवारी:
श्रीगोंदा न.पा.ची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच जानेवारीत पार पडली,त्यात भाजपाचे ११ नगरसेवक तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस चे ९ असे नगसेवक जनतेतून निवडून आले.दिनांक १ फेब्रुवारी ला शुभांगी मनोहर पोटे यांनी श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होत,आज दिनांक २० फेब्रुवारी रोजी २ स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष पदाची निवड पार पडली आहे .यात भाजपाचे विद्यमान नगरसेवक व बबनराव पाचपुते यांचे कट्टर समर्थक अशोक खेंडके यांना ११ मते मिळाली असून.काँग्रेस आघाडीचे संतोष कोथिंबीरे यांना ९ मते मिळाली आहेत.यानुसार अशोक खेंडके यांची ११:९ मतांनी श्रीगोंदा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी निवड झाली आहे.
त्याचबरोबर भाजपा कडून महावीर पटवा तर आघडीकडून समीर बोरा यांची स्वीकृत नगरसेवक पदी वर्णी लागली आहे.
महावीर पटवा यांचे वडील व श्रीगोंदा शहराच्या राजकारनात नावाजलेल्या तशेच श्रीगोंदा न.पा.चे प्रथम नगराध्यक्ष, प्रकाश शेठ पटवा यांच्या पश्चात महावीर पटवा यांना भाजपा ने व माजी मंत्री पाचपुते दादांनी संधी दिल्याची प्रतिक्रिया जैन समाजातून येत आहे.त्याचबरोबर समीर बोरा हे श्रीगोंदा नगरपालिकेत तत्कालीन नगरसेवक होते.त्यांनाही स्वीकृत नगरसेवक म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिल्याने जैन समाजातून आभार व्यक्त केले जात आहे.
राजकीय अभ्यासक व उद्योगपती सतीश शेठ पोखरणा  यांनी या निवडीचे स्वागत केले असून,माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह ,सदाशिव पाचपुते, बापूशेठ गोरे,यांचे समाजाच्या वतीने विशेष आभार मानले आहेत.महावीर पटवा यांच्या निवडी विषयी माध्यमांशी बोलतांना पोखरणा यांनी प्रथम नगराध्यक्ष प्रकाश शेठ पटवा यांच्या कार्यकाळावर प्रकाशझोत टाकला.त्यांच्या कालखंडात प्रकाश शेठ यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक कामे केली असल्याचे नमूद केले.१९७२ च्या दुष्काळी परिस्थितीत श्रीगोंदा शहरवासीयांना पटवा व बोरा यांच्या पूर्वजांनी सामाजिक भूमिकेत सहकार्य केल्याचे यावेळी पोखरणा यांनी सांगितले. तोच वारसा महावीर पटवा चालवतील अशी समाजाची आशा आहे.हे सामाजिक कार्य पूर्णत्वला नेण्यासाठी भाजपाने पटवा यांना संधी नाहीतर जीम्मेदारी सोपवली असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले आहे.

(श्रीगोंदा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी अशोक खेंडके यांची निवड झाली.त्यावेळी आई वडिलांसोबत )

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading