प्रधानमंत्री आवास योजनेच्या शशिकला पोपट रोही ठरल्या प्रथम लाभार्थी…
श्रीगोंदा दिनांक २२ फेब्रुवारी :
नगरपरिषद प्रभाग दोन मध्ये गणेश भोस यांनी प्रभागाच्या कामाला सुरवात केली आहे.यानुसार श्रीगोंदा न.पा. कार्यक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल योजनेचा प्रथम लाभ शशिकला पोपट रोही (आळेकरमळा ) यांना मिळाला असून,त्यांच्या कामाचे भूमीपूजण श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.शुभांगी मनोहर पोटे यांच्या मार्गदर्शना खाली प्रभाग दोनचे नगरसेवक गणेश बाबासाहेब भोस यांनी दिनांक २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता केले आहे.
यावेळी नितीन रोही(सामाजिक कार्यकर्ते),बाळासाहेब दांडेकर,शरद औटी,माउली आडोले,लाला झराड,पोपट आलेकर,प्रशांत कटारे, गणेश गणीशे,उपस्थित होते.