दिनांक २३ व २४ फेब्रुवारी रोजी विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन…
श्रीगोंदा दिनांक २३फेब्रुवारी:
श्रीगोंदा तालुक्यातील मतदारांना स्थानिक महसूल प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे की,आगामी लोकसभा निवडणूक २०१९ विचारात घेऊन ,मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही.अश्या वंचीत नागरिकांना मतदार नोंदणी साठी आणखी एक संधी मिळावी म्हणून ,वोटर व्हेरिफिकेशन अँड इम्फॉर्मेशनया कार्यक्रमा अंतर्गत भारत निवडणूक आयोगाने, शनिवार व रविवारी या सुट्टीच्या दिवशी, विशेष मतदार नोंदणी मोहीम आयोजित करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
त्या अनुषंगाने दिनांक २३ व २४ फेब्रुवारी २०१९ रोजी श्रीगोंदा तालुक्यात सदर मोहीम राबविण्यात येणार असल्याचे, प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे.तरी बी.एल.ओ. यांच्या मार्फत फॉर्म क्र.६,७,८ व ८(अ)भरून घावेत .असे आव्हान माननीय श्री.राहुल द्विवेदी (जिल्हाधिकारी, तथा जिल्हा निवडणूक अधिकारी )व श्री.शाहूराज मोरे (उप जिल्हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर)यांनी केलेले असून ,तालुक्यातील सर्व राजकिय पक्षांना देखील लेखी पत्राद्वारे कळविले आहे. जास्तीत जास्त अचूक मतदार यादी व कोणीही मतदार वंचित राहणार नाही, याकामी सहकार्य करणे बाबत कळविण्यात आले असल्याचे,या पत्रात नमूद केले आहे.त्याचबरोबर तमाम नागरिकांना स्थानिक व जिल्हा प्रशासना मार्फत नोंद करण्याचे आव्हान करण्यात आले असल्याचे ,प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे.