बेलवंडी स्टेशन परिसरात शेतकऱ्याच्या शेळीवर बिबट्याचा हल्ला..

श्रीगोंदा दिनांक २३ फेब्रुवारी:
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी स्टेशन परिसरात,वास्तवास असणाऱ्या संदीप अरकत या शेतकऱ्याच्या गोठ्यातील मोठी शेळी, बिबट्या ने हल्ला करून मारून टाकली असल्याची घटना, दिनांक २२ फेब्रुवारी रोजीच्या पहाटे साधारण ३ च्या दरम्यान घडली असल्याची माहिती समजली आहे.
सविस्तर वृत्त असे की,श्रीगोंदा तालुक्यातील विविध भागांत अश्या पध्दतीने श्वापद दिसून आल्याचे,वारंवार चर्चिले जात आहे.त्यात घडलेल्या काही घटना, कोणत्याही पुराव्या शिवाय किंवा प्रशासकीय मान्यते शिवाय सामाजिक माध्यमातून लगेच व्हायरल होतता.आणि समाजात वेगळीच भीती पसरली जाते.अश्या घटनांत मीमांसा करणे गरजेचे असते.त्यानुसार घडलेल्या या घटनेनंतर आम्ही थेट या पीडित शेतकऱ्याशी संवाद साधत, या घटनेची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
संदीप अरकत हे या घटनेतील पीडित शेतकरी असून,त्यांचे ओढ्या काठी घर आहे.दिनांक २२ फेब्रुवारी च्या रात्री साधारण २ ते ३ वाजनेच्या सुमारास दारातील कुत्री मोठं-मोठ्याने भुंकू लागल्याने अरकत कुटुंबातील लोक जागे झाले.त्यांनी बाहेर पाहिले असता ,त्याठिकाणी गोठ्यात असलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला होता. शेळी दाबून ओढून नेत असतांना तिच्या मागे एक छोटे शावक ही होते. त्यावरून,ती मादी बिबट्या असावी.असे,अरकत यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.या घटनेनंतर बेलवंडी व आसपासच्या परिसरात लोकांत मोठ्या प्रमाणात दहशत व भीती चे वातावरण निर्माण झाले असल्याचे समजते आहे.
संदीप अरकत यांनी या घटनेची माहिती स्थानिक पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवल्या नंतर,घटनास्थळी त्या श्वापदाच्या पंजाच्या निशानांवरून तो बिबट्या असल्याचे अधिकऱ्यानीं नमूद केल्याचे अरकत यांनी माध्यमांना सांगितले आहे.वन अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नसल्याने,अधिक माहिती समजू शकली नाही.या घटनेच्या चार दिवस आधी,येथीलच एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील म्हशीवर अज्ञात श्वापदाने हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading