नगरपालीका कार्यक्षेत्रा मधील प्रभाग दोन आळेकर मळा रस्ता अर्धा कि.मि डांबरीकरण.

दिनांक ३ सप्टेंबर,श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरामधील प्रभाग दोन मधील आळेकर, गनिशे, रोही मळयातील मांडवगण रोड पासून शिव-रस्ता ५०० मीटर डाबरी करण होत आहे.

मागील काही दिवसांनपूर्वी दरम्यानचा रस्ता पावसामुळे मोठ्या प्रमाणात खराब झालेला होता. सदर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले होते. पावसामुळे सदर खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे मोठ अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. तसेच, सदर रस्ता हा वाहतुकीचा व वर्दळीचा असल्यामुळे रस्त्यावरून नागरिकांना ये – जा करण्याकरिता मोठ्या प्रमाणात कसरत करावी लगत होती.या रस्त्यावरून वृद्ध लहान मुले, महिला यांना ये -जा करावी लागते, पर्यायी रस्ता नसल्यामुळे फक्त याच रस्त्याचा वापर होत होता.परंतु, हा रस्ता वापर करण्याजोगा राहिलेला नव्हता. हा रस्ता अपघाताचे केंद्र म्हणून तयार झाला होता. सदर रस्ता लवकरात लवकर दुरुस्त होणे अतिशय गरजेचे होते.

या भागातील लोकांची संख्या जवळपास ६०० ते ८०० च्या आसपास आहे. तसेच, या रस्त्यासंदर्भात तात्काळ लक्ष घालून नगरध्यक्षा शुभांगी पोटे यांनी येथील ग्रामस्थांचा विश्वास जिंकल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. रस्त्याचे काम जलद गतिने चालू आहे. येत्या काही दिवसांत येथील ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

(छायाचित्रात):
रस्त्याची पाहणी करताना (मा. नगरध्यक्ष) मनोहर पोटे, (नगरसेवक) गणेश भोस, सतीश मखरे, (प्रहारचे मा. अध्यक्ष) नितीन रोही, सचिन गनिशे व ग्रामस्थ.

स्रोत:(नितीन रोही यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading