श्रीगोंदा तालुका भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी तालुका कार्याध्यक्षपदी प्रशांत पवार..

दिनांक ३ सप्टेंबर,श्रीगोंदा/अहमदनगर:

आज झालेल्या भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीच्या कार्यकारणी मध्ये प्रशांत मच्छिंद्र पवार यांना कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांना विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष रोहित गायकवाड यांच्या सहीचे नियुक्तीपत्र युवा नेते विक्रमसिंह पाचपुते, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नितीन नलगे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष रोहित गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित माजी नगराध्यक्ष बापू तात्या गोरे, उपनगराध्यक्ष अशोक भाऊ खेंडके, शहराध्यक्ष संतोष खेतमाळीस, कार्याध्यक्ष राजेंद्र उकांडे, नगरसेवक आंबादास औटी, अमोल शेलार, महेश शिरसागर यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

स्रोत:(प्रमोद आहेर यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading