वंचित बहुजन आघाडीच्या श्रीगोंदा तालुका अध्यक्ष पदी कांतीलाल कोकाटे यांची नियुक्ती..
वंचित बहुजन आघाडीच्या श्रीगोंदा तालुका अध्यक्ष पदी कांतीलाल कोकाटे यांची नियुक्ती.
श्रीगोंदा दिनांक २६ फेब्रुवारी :
भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब व एम.आय.एम चे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील विविध वंचित समाज घटकांचा आत्मसन्मान जागृत करून, लोकशाही प्रक्रिया समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी, स्थापना करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या, श्रीगोंदा तालुका कार्याध्यक्ष पदी प्रमोद काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बरोबरच कांतीलाल कोकाटे यांची तालुकाध्यक्ष पदी, अमोल पवार यांची तालुका उपाध्यक्ष पदी तर सुनील फाजगे यांची तालुका सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अॅड डॉ. अरुण जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी उप नगराध्यक्ष जालिंदर(तात्या)घोडके,मुकुंदजी सोनटक्के, सुरेश चव्हाण (सर),संतोष जौजाळ, (तालुका उपाध्यक्ष) मंगेश घोडके,दादा कुटे, महेश शिंदे, डॉ. केंजके, विलास काळे, संतोष भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.