श्रीगोंदा-कोल्हापूर बस पुन्हा सुरू,आगारात रिबन कापून शुभारंभ…
श्रीगोंदा दिनांक १ एप्रिल:
अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या,बस गाड्यां पैकी श्रीगोंदा-कोल्हापूर ही बस आज दिनांक १ एप्रिल पासून श्रीगोंदा वासीयांच्या सेवेत श्रीगोंदा बस आगार व्यवस्थापनेकडून सुरू करण्यात आली आहे.ही बस श्रीगोंदा-दौंड-बारामती-फलटण-सातारा-कराड-शिरवली नाका मार्गे कोल्हापूरला जाणार आहे.सकाळी १०:३० वाजता श्रीगोंदा आगारातून ही बस कोल्हापूर साठी निघणार आहे.
त्याचबरोबर १०.१५ वा.(श्रीगोंदा-नगर-शिखर शिंगणापूर),०६.०० वा.(श्रीगोंदा-पारगाव-नगर-नाशिक),०९.०० वा.(श्रीगोंदा-मांडवगण-नगर-नाशिक),०९.३० वा.(श्रीगोंदा-पारगाव-नगर-नाशिक)या मार्गावर ही नवीन बस सुरू करण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रम प्रसंगी श्रीगोंदा-कोल्हापूर या बसचा शुभारंभ करण्यात आला आहे.यावेळी,श्रीगोंदा (पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक)श्री.विठ्ठल पाटील,(सामाजिक कार्यकर्ते)श्री. गोपाळराव मोटे,(सामाजिक कार्यकर्ते)श्री.दीपक घोडके,(दैनिक पुण्य नगरी वृत्तपत्राचे) पत्रकार श्री.विशाल चव्हाण,आगारातील(कार्यशाळा प्रमुख)प्रशांत होले,(वाहतूक निरीक्षक)रोहित रोकडे,(आगार लेखाकार)अवधूत कांबळे,(वाहतूक नियंत्रक) शंकर ढवळे,(चालक) बेंद्रे,(वाहक) मगर तसेच प्रवाशी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
संध्याकाळी ९:०० वाजनेच्या पुढे (बीड-श्रीगोंदा),(पुणे-श्रीगोंदा) सह दोन जिल्ह्यांना जोडतील अश्या पद्धतीने बस चालू करण्यात याव्यात.तशेच,नमूद कोल्हापूर व कल्याण गाडी पुन्हा चालू करण्यासाठी,वकील संभाजीराव बोरुडे यांनी त्यांच्या (फुले-आंबेडकर विचारमंच)च्या वतीने काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा आगाराचे (आगार प्रमुख)प्रवीण शिंदे यांना निवेदन सादर करून चर्चा केल्याचे संभाजी बोरुडे यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत नमुद केले आहे.