कोणतेही राजकीय पद नसतांना जन कल्याणाची कामे केली आणि करणार : डॉ.सुजय विखे…

काष्टी,श्रीगोंदा, दिनांक ३० मार्च:
काल श्रीगोदा तालुक्यातील काष्टी येथे दिन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानी भाजपा,शिवसेना,रीपाई(आठवलेगट),रासपा महायुतीच्या कारकर्ता मेळाव्यात बोलतांना महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आपली भूमिका मांडली.यावेळी मंचावर माजी मंत्री राम शिंदे,बबनराव पाचपुते, प्रा.शशिकांत गाडे,भगवान फुलसौंदर,अनिल ठवाळ, दत्ता पानसरे,भगवानराव पाचपुते,विठ्ठल काकडे,प्रा.तुकाराम दरेकर,पुरुषोत्तम लगड,भाऊसाहेब गोरे,सुभाष डांगे,राजेश डांगे,आण्णा शेलार,संग्राम पवार,बंडू जगताप,स्मिताताई तरटे ,संतोष खेतमाळीस,सतिष क्षीरसागर, सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री बबनराव पाचपुते, राम शिंदे,यांचे मार्गदर्शन पर भाषणे झाली. डॉ.सुजय विखे यांनी या कार्यक्रमात बोलतांना सांगितले की,या लोकसभा निवडणुकीत उच्च शिक्षित उमेदवारां पैकी मी एक उमेदवार आहे.लोकांनी विचारणा केली की,तुम्ही ग्राम पंचायत पंचायत समिती,जिल्हा परिषदेच्या पैकी कोणत्याही निवडणूका न लढता थेट लोकसभा ? यावर बोलताना विखेनी लोकसभेचा उमेदवार कसा असावा याचे विश्लेषण केले.त्यांनी सांगितले की,सामान्य जनतेने मी आणि विरोधात उभे असलेल्या उमेदवाराचे परीक्षण करावे. कारण संसदेत निवडून गेल्यावर हिंदी आणि इंग्रजी मध्ये भाषण व संभाषण करावे लागते.अडाणी किंवा अशिक्षित उमेदवारांचे तिथे काही काम नाही.दोघांत निकष लावण्याची जीम्मेदारी सामान्य जनतेची असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी कार्यकर्त्यानां मार्गदर्शन करताना डॉ.विखे म्हणाले की,आयोगाचे मी मनापासून आभार मानतो,कारण यावेळी निवडणूक आयोगाने काही निकष जाहीर करण्याचे ठरविले आहे.त्यात उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर त्या उमेदवाराला स्वतः वरील गुन्हे नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस सर्वांनी वर्तमानपत्र आवर्जून वाचवते असेही विखेंचे म्हणणे आहे.
प्रत्येक जण आपल्या कौशल्य आणि कर्तृत्वाने पैसे कमवतो.त्या कमविलेल्या पैश्याचा वापर सामान्य आणि गरिबांना नवजीवन देण्यासाठी करण्याची दानत फक्त विखें कुटुंबियांमध्ये आहे असेही विखे यावेळी बोलतांना म्हणाले आहेत.विरोधकांनी सदाशिव लोखंडे यांच्या गावात जाऊन तो बाहेरचा आम्ही घरचे असे संभाषणे केली मात्र त्यांना उत्तर देतांना विखें म्हणाले की,त्याच गावातील लोखंडे यांनी आम्ही शिर्डीचे खासदार बनविले आहे.बाहेरचे आणि घरचे बोलण्यापेक्षा विकासावर बोला असेही त्यानी विरोधी उमेदवारांना आवाहन केले आहे.मात्र यांच्याकडे विकासावर बोलण्या सारखे काही नाही.
मला स्वतः कोणतेही राजकीय पद नसतांना गेल्या तीन वर्षांत ७५ हजार पीडित रुग्णांना मोफत आरोग्य सेवा योजनेतून जीवनदान देण्याचे काम केले आहे.पद नसतांना जिल्ह्यातील २०८ आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दत्तक घेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सर्वस्वी जीम्मेदारी स्वीकारली.महाराष्ट्रातील १५ हजार रुग्णांना त्यांच्या घरांपर्यंत मोफत पोहोचले, कोणतेही पॅड नसतांना २.५लाख लोकांचा अपघाती विमा उतरवला,तीन वर्षांपासून त्यांचा प्रीमियम भरला,आणि २.२५ कोटी रुपये,अपघात झालेल्या लोकांच्या कुटुंबातील सदस्यांना दिले.पैसे सर्वांकडेच आहेत मात्र,सामान्य जनतेच्या जंकल्याणासाठी व त्यांना नवजीवन देण्यासाठी दानत लागते आणि ती दानत विखें कडे आहे,शिवाय कधीही कोणाची किंमती पैश्यात केली नसल्याचे डॉ.विखे यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.
मी गेल्या तीन वर्षांपासून सक्रिय होतो.स्वतःला सिद्ध करायचे होते,आई वडिलांना कधीही कोणत्याही प्रकारची शिफारस केली नाही,स्व कर्तृत्वाने लोकसभा लढविन,मी कोणाचा भाचा आहे, कोणाचा जावई आहे,कोणाचा मुलगा आहे हे सिद्ध करायचे नव्हते.असेही विखें बोलताना म्हणाले आहेत.आई वडील उपस्थित नसले तरी,हा उपस्थित जनसमुदाय माझे कुटुंबिय आहेत म्हणत,त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading