अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांची कारवाई…

(कारवाईत ३२ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त)
श्रीगोंदा दिनांक २८ मार्च :
श्रीगोंदा तालुक्यातील भीमा व घोड नदी पात्रात अनेक वर्षांपासून अवैध रित्या स्थानिक व बाहेरून(दौंड, शिरूर ,पुणे) या भागांतून येणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून राजरोसपणे वाळू तस्करी केली जात आली आहे.शहरी भागातील वाढत्या बांधकाम व्यावसायाचे हे फलित असून.स्थानिक प्रशासनाने यां धंद्यावर अनेक वर्षांपासून कारवाई करुन, बंद करण्याचा शर्तीचा प्रयत्न केला आहे.स्थानिक प्रशासनाच्या काही कार्मचाऱ्यांचा वाळूवरील कारवाई दरम्यान बळी गेल्याचे सर्वश्रुत आहे.काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याचेही अनेक उदाहरणे आहेत.नुकतेच  पारनेर-श्रीगोंदा चे प्रांताधिकारी गोविंदा दानेज यांच्यावर बनपिंप्री येथे बड्या पुढाऱ्यांच्या संबंधित वाळू माफियांने प्राणघातक हल्ला केला होता.काही माध्यम प्रतिनिधींच्या गड्यांवरही वार्तांकना दरम्यान दगडफेक करण्यात आली होती.त्यामुळे या कारवाईवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखेच आहे. श्रीगोंदा तालुक्याच्या कार्यक्षेत्रात वाळू तस्कारांनी मोठे थैमान घातले असून ,त्यांच्यावर ठोस कारवाईची स्थानिकांची अपेक्षा आहे.मात्र प्रशासन कारवाई करण्यास सुरुवात का करीत नाहीत ?हाही एक प्रश्नच आहे.
दिनांक २७ मार्च रोजी संध्याकाळी श्रीगोंदा पोलीसांना मिकालेल्या गुप्त माहितीनुसार आर्वी परिसरात,भीमा नदी पात्रात अवैध वाळू तस्करी चालू असून , देऊळगाव राजे गावच्या दिशेने काही वाहन वाळू वाहून नेत असल्याचे समजले वरून.सायंकाळी ६:३० वाजता चे सुमारास पो.स.इ.कर्णवार,पो.कॉ.दादासाहेब टाके,योगेश सुपेकर,यांना पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी दिलेल्या माहितीनुसार कारवाईची कल्पना दिली की,आर्वी गावच्या भीमा नदीच्या बेटात काही लोक विना परवाना वाळू वाहतूक करीत असल्याने त्यांच्यावर पो नि श्रीगोंदा यांनी कारवाईचा आदेश दिला.त्यानुसार घटनास्थळी पथकाने तपास केला असता,आर्वी गावचे पश्चिमेला देऊळगाव राजे गावाच्या दिशेने चार मालवाहतूक ट्रक वाळू भरून जात असल्याचे दिसले.त्यांना अडवुन शासकीय परवाना असल्याचे पोलिसांनी विचारणा केली.  मात्र त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे समजले.त्यातील ट्रक क्र.एम.१२ सी.टी.९७४५ चा चालक पोलिसांना पाहून पळून गेला असल्याचे पोलिसांनी कारवाईत नमूद केले आहे.
संदीप फुलचंद राठोड(रा.दौंड,जिल्हा पुणे),निलेश तुकाराम मोरे,वय २९ (रा.देऊळगाव राजे,दौंड,पुणे),स्वामी बबन अवचर (रा.देऊळगाव राजे,दौंड,पुणे),दिलीप किसन गिरमे,वय ४०(रा.गोपाळवाडी,दौंड ,पुणे),गणेश काशीनाथ पवार वय २५(रा.खोरोडी,दौंड,पुणे),यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन टाटा कंपनीचा ८ लाख २४ रुपये किंमतीचा ट्रक क्रमांक (एम.एच.४२ बी.७३३४)व चार ब्रास वाळू किंमत २४ हजार रुपये. त्याच बरोबर ८ लाख २४ हजार रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक(एम.एच.१४ बी.जे.०९२३)व चार ब्रास वाळू किंमत२४ हजार रुपये,७ लाख ७४ हजार रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक (एम.एच१२ सी.टी.९७४५)व चार ब्रास वाळू किंमत २४ हजार रुपये,८ लाख २४ हजार रुपये किमतीचा ट्रक क्रमांक (एम.एच.१४ बी.जे.५९४४)व २४ हजार रुपये किमतीची वाळू,असे एकूण ३२ लाख ४६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेत,आरोपीं विरोधात भां.द.वि.कलम ३७९,३४ सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम ३/१५ नुसार कारवाई केली आहे.
अश्या कारवाई सोबतच श्रीगोंदा तालुक्याच्या विविध भागात, जसे की, पेडगाव,अजनुज, गार,कोठा,अनगरे,आर्वी,दरेकर वाडीचा श्रीगोंदया कडील भाग,शेडगाव,सांगवी,भांनगाव,चांडगाव सह ओढे,नाले,छोट्या नद्या यांच्यात आज आणि आत्ता सुद्धा चालू असलेली अवैध वाळू तस्करी थांबविण्याचा प्रयत्न करावा असा सामान्यांचा सूर येत आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading