पाचपुतेंच्या तालमीतुन बंडखोरी केलेले मल्ल,अखेर पचपुतेंच्या आखाड्यात… विखे पॅटर्नचा परिणाम?
श्रीगोंदा दिनांक २६ मार्च :
श्रीगोंदा येथील माऊली या बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आण्णा शेलार हे बबनराव पाचपुते यांच्या बरोबर डॉ. विखेंच्या प्रचारार्थ सक्रिय झाल्याचे समजते आहे.दोन दिवसांपूर्वी डॉ.सुजय विखे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना,प्रसंगी नागवडे कुटुंबातील सदस्यांना लोकसभेची तिकीट मिळाली असती तर, त्यांचे कामं करावे लागले असते. मात्र कोणत्याही परिस्थितीत पाचपुतेंना मदत करणार नाही.हे खुलेआम पत्रकरांना सांगणारे.आज थेट बबनराव पाचपुते यांच्या गोठ्यात गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
९० च्या दशकात पाचपुतेंचे कार्यकर्ते असणारे शेलार हे त्यांचाच आधार घेत सरपंच ते सभापती त्याचबरोबर जिल्हा उपाध्यक्ष पदापर्यंत पोहचले.त्यांच्या मुळेच राजकारणात ते सक्षम झाले.हे सर्वसामान्य माणसांना ज्ञात आहे.
मागील दोन पंचवार्षिक पाचपुते विरोधात बंडखोरी करून,विधानसभेला पराभूत झाले,माजी मंत्र्यांना विरोध करीत,तत्कालीन काँग्रेस पदाधिकाऱ्यां बरोबर जाऊन, प्रभारी जिल्हाध्यक्ष पद मिळविले,त्यानंतर पाचपुतेंना विरोध करणाऱ्यांना गावातील सरपंच पदासाठी पाचपुतेंचा आधार घ्यावा लागल्याचे सर्वश्रुत आहे.मात्र येवढे सगळे होऊन,शेलार यांना सुजय विखे यांचे उमेदवारी च्या निमित्ताने पुन्हा आज दिनांक २६ मार्च रोजी माऊली निवासस्थानी जाऊन पाचपुतेंच्या गोठयात सामील व्हावे लागल्याचे चित्र समोर आले आहे.
आज डॉ.सुजय विखे यांच्या लोकसभा निवडणुकी संदर्भात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात माऊली निवासस्थानी विविध कार्यकर्ते उपस्थित होते.यामध्ये माजी काँग्रेस-राष्ट्रवादी या महाघाडीचे निष्ठावाण कार्यकर्ते बाळासाहेब गिरमकर,सुभाष डांगे,भगवानराव पाचपुते,अनिल मामा पाचपुते,अनिल ठवाळ, विलास भोसले,दत्तात्रय पानसरे,विठ्ठल काकडे,वैभव पाचपुते, माणिकराव पाचपुते,भाई ईनामदार,मधूकर लगड,माऊली हिरवे यांच्यासह अनेकांनी डॉ.विखें यांच्या लोकसभा उमेदवारी निमित्ताने सक्रिय सहभाग दर्शविला आहे.
याप्रसंगी बोलतांना पाचपुते म्हणाले की, डॉ.विखे यांना खासदार बनवायचे आहे,देवेंद्र फडनविस हे सकारात्मक मुख्यमंत्री आहेत,साडे तेरा कोटी सामान्य लोकांना गॅस उपलब्ध करून दिला आहे ,वीज उपलब्ध करून दिली आहे, शेतकऱ्यांना प्रत्येकी ६ हजार रुपये खात्यात देणार आहेत,त्यापैकी २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत,तसेच बेटी बचाव बेटी पढाओ बरोबर स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे,सर्जिकल स्ट्राईक मुळे संपुर्ण देशातील वातावरण बदलेले आहे,बी.जे.पी हा घराणेशाहीचा पक्ष नसून,कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.डॉ.सुजय विखे हे येथे सर्व उपस्थितांचे उमेदवार आहेत.त्यांच्यावर शंका घेण्याचे काही कारण नसून.जे आले नाहीत त्यांच्याविषयी काही बोलू नका.असे पाचपुते यावेळी म्हणाले आहेत.”ज्यांच्यासाठी काम केले,त्यांनीच अडचण केली. आणि ज्यांच्यासाठी काहिच केले नाही.त्यांनी मदत केली.”
माजी खासदार दिलीप गांधी हेही लवकरच आपल्या सोबत येणार असल्याचे पाचपुतेंनी स्पष्ट केले आहे.शुक्रवार दिनांक २९ मार्च रोजी काष्टी येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, याठिकाणी सर्वांना उपस्थित राहण्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी आवाहन केले आहे.
या मेळाव्यात पुरुषोत्तम लगड,गणेश झिटे, पोपट खेतमाळीस,बापूशेठ गोरे,संतोष खेतमाळीस,अनिल औटी तशेच अंबादास औटी.सह बहुतांश कार्यकर्ते उपस्थित होते.