दलित वस्तीत चाललेले रस्त्यांचे कामे निकृष्ठ दर्जाचे ? इस्टीमेट प्रमाणे कामे करा.अन्यथा आंदोलन करणार :- चांडगाव ग्रामस्थ…
श्रीगोंदा दिनांक २६ मार्च:
श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव या गावात असलेल्या दलित वस्तीत चालू असलेले रस्ता काँक्रेटीकरणं तशेच डांबरीकरण अतिशय खालवलेल्या गुणवत्तेनुसार चालू केले असून,येथील ग्रामस्थांनी या कामाच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत चालू असलेल्या या कामाची गुणवत्ता ढासळली असल्याचा या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निवेदनात सह्या दिलेल्या लोकांचा आरोप आहे.
त्यांनी श्रीगोंदयाचे (तहसीलदार) महेंद्र माळी(महाजन), (पोलीस उप निरीक्षक) पाटील साहेब व गटविकास अधिकारी श्रीगोंदा (पंचायत समिती)यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मौजे चांडगाव तालुका श्रीगोंदा येथील मातंग वस्ती व दलित वस्ती येथील काँक्रेटिकरन व डांबरीकरण कामाची पाहणी बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी श्री.पोले साहेब यांनी करून,संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना इस्मेस्टीमेट प्रमाणे करण्याचे सांगितले होते.सदर रस्त्याचे काम ठेकेदार व गावचे सरपंचपती यांनी संगनमताने निकृष्ठ दर्जाचे केले आहे.पोले साहेबांनी सांगितल्या पद्धतीने मुरुम न टाकताच ठेकेदाराने मनमानी कारभार करीत,नुसती खडी टाकून पुढील काम चालू केले आहे.सदरील काम बांधकाम अधिकारी यांनी सांगितले प्रमाणे होत नसल्याने.या कामाची दर्जा आणि गुणवत्ता ढासळत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासकीय नियम व बांधकाम अधिकारी यांनी निश्चित केल्यानुसार काम करण्यात यावे, तशेच इस्तिमेट प्रमाणे काम करण्यात यावे या मुख्य मागण्यांसाठी दिनांक २८ मार्च रोजी पंचायत समितीच्या समोर विनायक गणपत म्हस्के,सोमनाथ संजय म्हस्के,तात्याभाऊ घोडके,सुनील कांतीलाल म्हस्के,अजित राजेंद्र म्हस्के,कल्याण दत्तू म्हस्के,मच्छीन्द्र शंकर चाकने,योगेश रायचंद म्हस्के,गणेश किसन म्हस्के,विनायक बाप्पू म्हस्के सह अनेक ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत.
या आंदोलनाच्या माध्यमातून ठेकेदाराचे लायसन्स,कार्ड, यापूर्वी केलेल्या निकृष्ठ कामांची यादी,जेथे जेथे दर्जाहीन कामे झाली आहेत.अश्या ठिकाणच्या लोकांना या आंदोलनात सहभागी करून घेत,त्यांचेही विषय येथे मांडण्यात येणार असल्याचे,यावेळी माध्यमांसी बोलतांना चांडगाव येथील या पीडित ग्रामस्थांनी सांगितले आहे.