शहीदे आजम भगतसिंग,राजगुरु,सुखदेव या क्रांतीवीरांना संभाजी ब्रिगेड व मान्यवारांच्या हस्ते मानवंदना..
दिनांक २४ मार्च :
दिनांक २३ मार्च रोजी भगत सिंग यांच्या प्रतीमेस उपस्थित मान्यवारांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन, भगतसिंग यांच्या जीवनावरील पुस्तके वाटन्यात आली.संगम एग्रो सर्वीसेस या ठीकानी आयोजित कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सातव ,श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव ,श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे,उपनगराध्यक्ष अशोक खेंडके,अंबादास औटी,नंदकुमार लाढाने,सतीश मखरे,संतोष खेतमाळीस,संतोष क्षीरसागर,प्रशांत गोरे, मोहळकर सर,अरविंद राऊत, सचिन झगड़े सर,सूर्यवंशी सर,शाम जरे ,राजेंद्र राऊत, सुरेश रन्नवरे,ज्ञानेश्वर वीखे पाटिल आदी मान्यवर उपस्तीत होते.उपस्तीतां पैकी पोलीस निरीक्षक जाधव व शुभांगीताई यांनी शहीद क्रांतीवीरांना अभिवादन केले.तसेच,मोहळकर सर,सचिन झगडे सर व शुभम बोडखे यांनी भगतसिंग यांच्या जीवनचरित्र व जीवनसंघर्षा विषयी उपस्थितांना माहीती करुण दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,नेहमी अनमोल सहकार्य करणारे पत्रकार हर्शल लोहकरे यांनी पुस्तके उपलब्ध करुण दिली.त्यांचे आयोजकांनी विशेष आभार मानले. तसेच संभाजी ब्रिगेड श्रीगोंद्याचे सुनील ढवळे,नानासाहेब शिंदे,गणेश अस्वर,गणेश पारे,इरफ़ान शेख,प्रवीण काळे,मंगेश लोखंडे,शिवाजी रोही,वैभव हिरडे,मयूर आढाव,सूरज शिंदे,गणेश ससाने,गणेश काळे,अमोल वाडवकर ,सचिन जंगले,नीलेश दांगड़े, आर्यन पखे,नील कापसे यांची मोलाची साथ लाभली.
कार्यक्रामाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अरविंद कापसे (तालुकाध्यक्ष-संभाजी ब्रिगेड) श्रीगोंदा यांनी केले.