जोपर्यंत पक्ष कारवाई करणार नाही तोपर्यंत पदाधिकारी राहणार :आण्णा शेलार…
श्रीगोंदा दिनांक २२ मार्च :
आज दिनांक २२ मार्च रोजी श्रीगोंदा येथील डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी आपली राजकीय भूमिका नमुद केली आहे.
त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले की,मी आणि माझे कार्यकर्ते यांनी गेल्या दोन आडीज वर्षांपासून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन दक्षिण अहमदनगर ची जागा डॉ.सुजय विखे यांच्या उमेदवारी साठी प्रयत्न केले .मात्र, सदर जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने ख्वाडा घालत,विखेंच्या जुन्या वादाला पुढे केले आणि,विखेना डावलले असल्याचे आण्णा शेलार यांनी या पत्रकार परिषदेत मांडले आहे.
यावेळी बोलतांना शेलार म्हणाले की, काँग्रेसने अशीच भूमिका ठेवल्यास काँग्रेस संपून जाईल.तसेच पक्ष्यांने माझ्यावर कारवाई केल्यास,जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यां ची बैठक घेऊन, निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे काम करणार का ? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना,पाचपुते यांनी सभापती केले तरी पद स्वीकारणार नसल्याचे आण्णा शेलार यांनी म्हटले आहे.यामुळे आण्णा शेलार हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना मदत करणार की नाही ? हे मात्र समजू शकले नाही.
माझ्यावर पक्ष्यांने कारवाई केलेली नाही.आणि जोपर्यत पक्ष कारवाई करीत नाही तोपर्यंत मी पक्षाचा पदाधिकारी राहणार.असेही त्यांनी नमूद केले आहे.त्याचबरोबर
अनुराधा नागवडे यांना लोकसहभेची तिकिट मिळाली असती तर, मला नागवडेंचे काम करावे लागले असते.असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.यावेळी जि.प चे सदस्य अनिल ठवाळ,पंदरकर महाराज सह पदाधिकारी उपस्थित होते.