एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन..
श्रीगोंदा, दिनांक २१ मार्च :
आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यां प्रती संवेदना जागृत करण्यासाठी तसेच आत्महत्या विरोधी भूमिका घेऊन शेतकऱ्यांची जनजागृती करून शेती विरोधी कायद्याची माहिती देण्यासाठी,युवक क्रांती दल मार्फत एक दिवसीय अन्न त्याग आंदोलन करण्यात आले.विदर्भातील साहेबराव करपे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी १९ मार्च १९८६ रोजी महाराष्ट्रात पहिली सामूहिक शेतकरी आत्महत्या केली. यांची स्मृती म्हणून,युवक क्रांती दल आणि किसान पुत्र आंदोलन या संघटनेच्या सहभागातून दिनांक १९मार्च रोजी हे आंदोलन करण्यात आले.
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, कोथुळ, घुटेवाडी,सुरेगाव चिखली येथे चारा छावणीला भेट देऊन,शेतकऱ्यांना शेती विरोधी कायद्यांची माहिती देण्यात आली.आत्महत्या विरोधी मानसिकता तयार करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले.
यामधे युवक क्रांती दलाचे रवी लाटे, किरण पोटफोडे, विनोद सोनवणे, संदीप सायकर, सुदाम लगड तसेच किसान पूत्र आंदोलनाचे बापू नलगे यांनीं आयोजित केला होता.या आंदोलनाचा समारोप,चिखली येथील छावणी मध्ये करण्यात आला.
या आंदोलनात सहभागी शेतकरी व कार्यकर्त्यांनी एक दिवसाचा उपवास ठेवला होता.धार्मिक बाबीसाठी अनेक वेळा उपवास करणारे शेतकरी पाहिले. मात्र,आज एका आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबासाठी लोकांनी उपवास केला.
दिवसभराचा उपवास सोडविण्यासाठी माजी कुलगुरू, डॉक्टर सर्जेराव निमसे सर, लोकटे सर,संभाजी ब्रिगेडचे (जिल्हाध्यक्ष) टिळक भोस उपस्थित होते. तसेच या आंदोलनासाठी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, संभाजी ब्रिगेड यांनी पाठिंबा दिला होता. चिखली ग्रामस्थ बहू संख्येने उपस्थितीत होते. शेतीविषयी योग्य धोरणाची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली..
डॉ सर्जेराव निमसे (माजी कुलगुरू):-
भारतीय शेती आणि शेतकरी यांवर सरकारने स्वतंत्र पणे विचार करण्याची वेळ आली आहे.अर्थव्यवस्थेतील मोठा वाटा शेती उत्पादनाचा असून उत्पादक जर दुर्लक्षित राहिला तर शेतकरी आत्महत्या थांबवायच्या कशा ?
बापू नलगे (किसान पुत्र आंदोलन):-
सरकार म्हणून कोणतीच संवेदन शिलता शेतकऱ्यां प्रति शिल्लक नाही शेती विरोधी कायदे हटवले तरच,शेतकरी जगेल.अन्यथा, काही खरे नाही.
टिळक भोस (जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड):-
प्रस्थापित व्यवस्था शेटजी,भटजी,लाटजी आणि यांची गुलाम आहे.इथे फक्त अदाणी,अंबानी साठी राज्यकर्ते काम करत आहेत.शेतकऱ्यांनी आत्महत्त्या ऐवजी बंड करण्याची मानसिकता तयार करावी.

